HIV झाल्याने नामांकित कंपनीने केले कर्मचाऱ्याचे निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हिंजवडीतील नामांकित सॉफ्टवेअर कंपनीतील इंजिनियरला एचआयव्हीची बाधा झाल्याचे समजल्यानंतर त्याला घरचा रस्ता दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रथम त्याला राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर तो राजीनामा देत नसल्याचे पाहून त्याला कंपनीने निलंबित केल्याचे पत्र पाठवून पुन्हा नोकरीवर घेण्यास नकार दिला आहे. हिंजवडी पोलिसांकडे दाद मागूनही पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याचे इंजिनियरचे म्हणणे आहे.

मुळचा पंजाबचा असणारा सॉफ्टवेअर इंजिनियर तरुण एका नामांकित कंपनीत नोकरीला होता. तो पंजाबला आई वडीलांसोबत राहात होता. त्यावेळी २०१५ नंतर त्याला सतत अशक्तपणा जाणवत होता आणि तो वारंवार आजारीही पडत होता. दरम्यान त्याच्या वडीलांना ऱ्हदयविकाराचा झटकाही आला होता. त्यानंतर त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला काही चाचण्या करण्यास सांगितले. त्यावेळी त्या एचआव्हीची लागण झाल्याचे समजले. त्याने उपचार सुरु केले. त्यानंतर तो २०१६ साली पंजाब सोडून पुण्यात आला. नोव्हेंबर २०१७ पासून पुण्यातील हिंजवडीत एका नामांकित कंपनीत नोकरी सुरु केली.

तो या कंपनीत टीम लिडर म्हणून काम करत होता. त्यानंतर गेल्या वर्षी जूलैमध्ये तो दोन-तीन वेळा आजारी पडला. त्यानंतर त्याला सुट्टी घ्यावी लागली. कंपनीच्या वरिष्ठांनी त्याला सुट्टी न घेण्याची सुचना करण्यात आली. त्यासाठी कंपनीच्या वरिष्ठांकडून त्याला त्रास दिला गेला. अखेर त्याला एचआयव्ही असल्याचे कंपनीच्या वरिष्ठांना सांगावे लागले. त्याच्यावर औंधमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते.

त्याच्या आजाराचे कारण सांगितल्यावर वरिष्ठांनी त्याला काही ना काही कारण सांगून राजीनामा देण्यास प्रवृत्त केले असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याला जूलै २०१८ मध्ये कंपनीत बोलवून काम चांगले नाही म्हणून राजीनामा देण्यास सांगितले. त्याने याबाबत राजीनामा देण्यास सांगण्याबाबतचे कारण विचारले. परंतु त्याने राजीनामा दिला नाही. कंपनीत दुसऱ्या दिवशी प्रवेश आणि इतर अधिकारी रद्द केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यानंतर कंपनीत त्याला जाता आले नाही. परंतु कंपनीने २ महिन्यांचा पगार घरी बसल्यानंतरही दिला. अकेर त्याला कंपनीने पुन्हा बोलवून कारणे दाखवा नोटीस दिली. त्याने मार्च महिन्यात कंपनीचा गोपनीय पासवर्ड शेअर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला. परंतु तो खरा नसल्याचे इंजिनियरचे म्हणणे आहे.

यासंदर्भात मी कामगार आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांनी कंपनीला नोटीस पाठवली असल्याचे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणाला.

Loading...
You might also like