सोहा अली खानची मुलगी म्हणतेय ‘गायत्री मंत्र’, ‘व्हायरल’ झाला व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग ठप्प झाले असून सर्वसामान्य नागरिकांपासून अभिनेत्यांपर्यंत अनेकजण घरामध्ये वेळ घालवित आहेत. अशातच अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांची लेक इनायाचा गायत्री मंत्र म्हणतानाचा एक जुना व्हिडीओ सोशल माडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओेमध्ये सोहा अली खानची लेक इनाया बोबड्या बोलात गायत्री मंत्र म्हणताना दिसत आहे. कोरोनामुळे संपूर्ण जग हा व्हायरस लवकरात लवकर नष्ट व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओेमध्ये सोहा अली खानची लेक इनाया बोबड्या बोलात गायत्री मंत्र नेटकर्‍यांना भावला आहे. सध्या कोरोनाच्या जागतिक संकटात तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल माडियावर व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडीओ आताचा नाही तर मागच्या वर्षीच्या रक्षाबंधनचा आहे. ज्यात कुणाल खेमूची बहीण त्याला ओवाळताना दिसत आहे. तर इनाया त्याच्या बाजूला उभी राहून गायत्री मंत्र म्हणत आहे. इनायाचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. यावर अनेकाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. अनेकांनी लहानग्या इनायाचे कौतुक केले आहे. कुणाल खेमू आणि सोहा याची लेक इनाया बॉलिवूडच्या पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. याआधी तिचे भाऊ तैमुरसोबतचे काही व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहे.