Sohail Khan Affair | ‘या’ महिलेमुळे सोहेलचा 24 वर्ष जुना विवाह मोडला का? अफेयरच्या वृत्ताची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sohail Khan Affair | सोहेल खान (Sohail Khan) अखेर त्याचे 24 वर्षांचे लग्न मोडणार आहे. अलीकडेच सीमा खान (Seema Khan) आणि सोहेल वांद्रे कोर्टाबाहेर (Bandra Court) स्पॉट झाले होते. कोर्टातून बाहेर पडताना दोघांनीही आपले मार्ग वेगळे केले, परंतु विवाहित असूनही सोहेल खानचे नाव एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे. हे दोघेही रोज स्पॉट होत होते. (Sohail Khan Affair)

 

कुटुंबाच्या विरोधात जाऊन केले होते लग्न

 

सोहेल खानला सीमा खान (Seema Khan) पहिल्या नजरेतच आवडली होती. दोघांचे नाते पुढे वाढत गेले आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. सोहेल आणि सीमाने 1998 मध्ये लग्न केले होते. लग्नाआधी सोहेल खान आणि सीमा खान यांचे आर्य समाज मंदिरात लग्न झाले. सीमाचे कुटुंब या लग्नावर खूश नव्हते पण नंतर कुटुंबाने सोहेल खान आणि सीमा खान यांच्या नात्याला मान्यता दिली. (Sohail Khan Affair)

 

हुमाशी जोडले गेले नावे

 

लग्नाच्या अनेक वर्षानंतर सोहेल खानचे नाव अचानक बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) सोबत जोडले जाऊ लागले.
सोहेल खान आणि हुमा कुरेशी यांच्या अफेअरच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. अनेक रिपोर्टमध्ये असा दावा केला जात होता की,
अफेअरच्या वृत्ताने सीमा खान खूप दुखावली होती आणि त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आला. सीमा खान खूप दिवसांपासून सोहेलसोबत राहत नव्हती.

 

शोमध्ये झाला खुलासा

 

सोहेल आणि सीमा (Sohail Seema Relationship) च्या नात्याचे सत्य लोकांसमोर तेव्हा उघड झाले जेव्हा नेटफ्लिक्स शो ’फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड व्हाईव्ज’ रिलीज झाला. या शोमध्ये सोहेल आणि सीमा वेगळे राहतात हे स्पष्ट करण्यात आले होते.

 

सीमाने असेही म्हटले होते की तिचे आणि सोहेलचे लग्न अनकन्व्हेंशन आहे. इतके की, एका एपिसोडमध्ये त्यांचा मुलगा निर्वाण याबाबत तक्रार करताना दिसला होता. या शोमध्ये निर्वाण अमेरिकेहून परतला होता आणि सीमाने त्याला तिच्या घरी राहायला सांगितले होते, पण निर्वानला सोहेलसोबत राहायचे होते.

 

Web Title :- Sohail Khan Affair | sohail khan rumoured affair with actress huma qureshi sohail khan and seema khan divorce

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Andrew Symonds Passed Away | अक्षय कुमारसोबत या चित्रपटात दिसला होता अँड्र्यू सायमंड्स, बॉलीवुडशी होते खास कनेक्शन

Washim News | कौतुकास्पद ! वाशिममधील हमालाचा मुलगा बनला मर्चंट नेव्हीत ऑफिसर

Nanded Police | नांदेड पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरच मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव सादर करू – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील