सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात सर्व दोषमुक्त पोलीस अधिकाऱ्यांना दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी आणि तुलसीराम प्रजापती यांच्या बनावट चकमक प्रकरणात गुजरात आणि राजस्थानचे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोपमुक्त करण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय दिला आहे . या अधिकाऱ्यांना दोषमुक्त केल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आहे. या प्रकरणातील ३८ आरोपींपैकी १५ जणांना दोषमुक्त केलं आहे, यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचाही समावेश आहे. न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी चालू होती.

सीबीआय कोर्टाने पाच पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या दोषमुक्तीला सीबीआय तसेच सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख हायकोर्टात आव्हान दिलं होतं. तर एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला दोषमुक्त न केल्याच्या निर्णयाला दिलेलं आव्हान दिल होत. अशा प्रकारे एकूण सहा पोलीस अधिकाऱ्यांना सोमवारी हायकोर्टाने दिलासा दिला आहे.

सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेखने राजस्थानमधील आयपीएस अधिकारी दिनेश एम एन, गुजरातचे आयपीएस डीजी वंझारा आणि राजकुमार पांडियन यांच्या दोषमुक्तीला आव्हान दिलं होतं. तर सीबीआयने गुजरातच्या क्राईम ब्रांचचे माजी अधिकारी एन के अमीन आणि राजस्थान पोलिस दलातील शिपाई दलपत सिंह यांच्या दोषमुक्तीला आव्हान दिलं होतं. तर गुजरातमधील आयपीएस अधिकारी विपुल अग्रवाल यांना दोषमुक्त करण्यास मुंबईतील सीबीआय कोर्टाने नकार दिला होता. त्या निर्णयाविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांची याचिका मान्य करत त्यांनाही हायकोर्टाने दोषमुक्त ठरवलं आहे.

[amazon_link asins=’B06Y4PW2LL,B01MZ6ER2J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1ec44d5-b4e2-11e8-bb59-5180f6ab6a50′]

गुजरात आणि राजस्थान पोलिसांनी कट रचत २००५ मध्ये गँगस्टर सोहराबुद्दीन शेखचं खोटं एन्काऊंटर केलं होतं. तसंच त्याची पत्नी कौसर बी हिचं अपहरण करुन नंतर तिला मारलं, असा आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला होता. तसंच सोहराबुद्दीनच्या एन्काऊंटरचा साक्षीदार असलेल्या तुलसी प्रजापती यालाही कालांतराने मारल्याचा आरोप केला होता.