चालकाकडून मित्रावरच अनैसर्गीक लैंगिक अत्याचार

सोलन (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यामध्ये मैत्रीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका ट्रक चालकाने मैत्रीचा गैरफायदा घेत दुसऱ्या ट्रक चालक मित्रावर बळजबरीने अनैसर्गीक लैंगिक अत्याचार केले. पीडित मित्राने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गैरवर्तन करणाऱ्या मित्राला अटक केली आहे. हा प्रकार बद्दी येथील ट्रक चालक संघटनेच्या कार्य़ालयाजवळ घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा येथील एका ट्रक चालकाने हे गैरवर्तन केले आहे. आरोपी हा बद्दी येथील ट्रक चालक संघटनेच्या कर्यालयात नोकरी करत आहे. काही दिवसांपूर्वी बद्दी येथील ट्रक चालक संघटनेच्या कार्यालयाजवळ हिमाचल प्रदेशातील रमशहरचा रहिवाशी असलेल्या पीडित व्यक्तीने ट्रक उभा केला होता. आरोपीने त्या रात्री दारूच्या नशेत पीडित ट्रक चालकावर बळजबरीने अनैसर्गीक लैंगिक अत्याचार केले.

पीडित ट्रक चालकाने याची तक्रार बिद्दी पोलीस ठाण्यात करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून बुधवारी नालागड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like