Coronavirus : सोलापूरमध्ये 2 ‘कोरोना’बाधितांचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन  –   सोलापुरातील कोरोना बाधिताची संख्या आता 277 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 19 इतकी झाली आहे. आज दोघा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

आज आसरा सोसायटी आणि शिक्षक सोसायटी येथील प्रत्येकी की एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. हा भाग तातडीने सील करण्यात आला आहे.

सोलापुरात आत्तापर्यंत 3442 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 3231 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 2954 निगेटिव्ह तर 277 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

आज एका दिवसात 133 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 131 निगेटिव्ह तर 2 पॉझिटिव्ह अहवाल आले .या दोन्ही महिला आहेत . कोरोना बाधित मृतांची संख्या सोलापुरात 19 वर पोहोचली आहे. यात 9 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे.

आज दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात एक 52 वर्षीय महिला रविवार पेठ परिसरातील आहे. ती दिनांक 6 मे रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. ती 11 मे रोजी रात्री तिचं निधन झालं .

तर दुसरी व्यक्ती शिवाजीनगर मोदी परिसरातील 71 वर्षीय पुरुष असून 4 मे रोजी ही व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती . 12 मे रोजी दुपारी ती मृत पावली आहे.

आत्तापर्यंत रुग्णालयातून 72 जण बरे होऊन घरी परतले आहेत तर 186 पॉझिटिव्ह रुग्णांवर सोलापुरात उपचार सुरू आहेत.