Solapur : दुर्दैवी ! भीमा नदीत बुडून 4 मुलांचा अंत

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोहण्यासाठी भीमा नदीत Bhima River गेलेल्या लवंगी येथील चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. यामध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. समीक्षा शिवाजी तानवडे (वय १३, इयत्ता आठवी), अर्पिता शिवाजी तानवडे (वय १२, इयत्ता सातवी), आरती शिवानंद पारशेट्टी (वय १२, इयत्ता सातवी) आणि विठ्ठल शिवानंद पारशेट्टी (वय १०, इयत्ता पाचवी) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

Maratha Reservation : ‘खासदार संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण…’

लवंगी येथील भीमा नदीपात्रात Bhima River शनिवारी दुपारी शिवाजी रामलिंग तानवडे हे पोहायला गेले होते. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या दोन मुली समीक्षा आणि अर्पिता आल्या. या दोघींच्यासोबत मेव्हण्याचा मुलगा विठ्ठल व मुलगी आरती हेही आले. मात्र शिवाजी तानवडे यांनी या चौघांना घरी पाठवले. त्यानंतर ते पोहोण्यासाठी नदीत उतरले असता हि चारही मुले पुन्हा आली आणि नदीत पोहोण्यासाठी उतरली. समीक्षाला पोहता येत होते. परंतु अर्पिताला पोहता येत नव्हते. समीक्षा हिस पाण्यात पोहत असताना आरतीने पकडले व अर्पिता हीस विठ्ठल याने पकडल्याने ते चौघे बुडू लागले. त्यांचे आवाज एकूण शिवाजी शिवाजी लगेच त्यांच्याजवळ पोहत जाऊन समीक्षा व आरती यांना थोडेसे बाजूला किनाऱ्याजवळ सोडले.

तुम्ही ग्लासऐवजी बाटलीने पाणी पिता का? जाणून घ्या नुकसान

त्यानंतर अर्पिता व विठ्ठल यास सोबत कडेला आणत असताना पाण्याच्या प्रवाहामुळे समीक्षा व आरती या पुन्हा बुडाल्या. त्याचवेळी शिवाजी यांच्या हातातील विठ्ठल व अर्पिता पण निसटले व ते पण बुडाले. यामुळे शिवाजी यांचा धीर सुटला आणि तेही बुडू लागले. शिवाजी बुडत असल्याचे नातेवाईक राचाप्पा उर्फ अप्पू संगप्पा पारशेट्टी यांनी पहिले असता शिवाजी यांना त्यांनी बाहेर काढले. दरम्यान, उजनीचे पाणी सोडल्याने भीमा नदी Bhima River दूथडी भरून वाहत आहे नदीपात्रात बुडालेल्या या मुलांचा रात्री उशाशिरापर्यंत शोध सुरू होता.

Also Read This : 

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या

10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 3378 जागांसाठी भरती; जाणून घ्या