Solapur ACB Trap | 15 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – वीज वापराचे कोणतेही बिल न आकारता नवीन वीज मीटर (Electricity Meter) बसवून देण्यासाठी 15 हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला (Junior Engineer) सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur ACB Trap) रंगेहाथ पकडले. सोलापूर एसीबीने (Solapur ACB Trap) ही कारवाई मंगळवारी (दि.27) माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर (Sadashivnagar) येथील महावितरण कार्यालयात (MSEDCL) केली.

 

सुमीत गुलाबराव साबळे Sumit Gulabrao Sable (वय- 27 सध्या रा. रणजित काळे बिल्डींग, फ्लॅट नं.9, दहीगाव रोड, नातेपुते ता. माळशिरस, जि. सोलापूर, मुळ रा. मु.पो. साबळेवाडी, ता. पाटण, जि. सातारा) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कनिष्ठ अभियांत्याचे नाव आहे. याबाबत 27 वर्षाच्या व्यक्तीने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

 

तक्रारदार यांनी त्यांच्या शेतामध्ये स्वतंत्र वैयक्तीक डी.पी. बसविला असुन त्याला 25 मार्च 2022 रोजी म.रा.वि.वि. कंपनी मर्या.
कार्यालय सदाशिवनगर यांचेकडून चार्जिंग परवानगी मिळाली आहे. तेव्हापासून हा डी.पी चालू झालेला होता.
परंतु त्याला कोणतेही मीटर बसविलेले नसल्याने तक्रारदार यांना सदर डी.पी. चे अद्याप कोणतीही विद्युत बिल आलेले नव्हते.
यातील आरोपी साबळे यांनी तक्रारदार यांना या विद्युत डी.पी. ला नवीन मीटर बसविण्यास सांगून मीटर बसविल्यानंतर यापुढे तक्रारदार यांना स्वतंत्र बिल येईल असे सांगितले.
तसेच डीपी चालू केल्यापासून ते आजपावेतो वीज वापरल्याचे कोणते बिल न आकारण्याकरिता 15 रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीची 22 सप्टेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता,
नवीन मीटरची जोडणी करुन मागील बील न देण्यासाठी साबळे याने 15 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार मंगळवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची 15 हजार रुपये रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

Web Title :- Solapur ACB Trap | A junior engineer of Mahavitaran company caught in the net of anti-corruption while accepting a bribe of 15 thousand rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Akola ACB Trap | 4 हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा कार्यकारी अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Cabinet Decisions | पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरणार, मंत्रिमंडळ बठकीत महत्त्वाचे 14 निर्णय

Pankaja Munde | भगवान भक्तीगडावर दसर्‍याची जोरदार तयारी, पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन, म्हणाल्या – तयारीला लागा…