Solapur ACB Trap | शिक्षिकेचा प्रलंबित पागार काढल्याच्या मोबदल्यात शिपायाने मागितली 5 लाख रुपये लाच, लाच घेताना एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात तर एक फरार

0
3559
Solapur ACB Trap | a soldier demanded a bribe of rs 5 lakh to withdraw the teachers pending salary one of the social welfare department was detained
file photo

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आश्रमशाळेतील शिक्षिकेचा प्रलंबित पगार (Pending Salary) काढल्याच्या मोबदल्यात चक्क वरिष्ठांच्या नावाने शिपायाने पाच लाख रुपये लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur ACB Trap) समाजकल्याण विभागातील शिपायाला लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहात पकडले. तर दुसरा पळून गेला आहे. सोलापूर एसीबीच्या पथकाने (Solapur ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.26) विजापूर रोडवरील हॉटेल सिद्धेश्वर येथे केली.

 

अशोक गेमु जाधव (वय-52 रा. शिमला नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. तर किसन मारुती भोसले (वय-52 सध्या रा. जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळा, मुळ रा. विकास मित्रमंडळ चौक, कर्वेनगर, पुणे) हे पळून गेले आहेत.

 

याप्रकरणातील तक्रारदार यांची पत्नी समाजकल्याण विभागाच्या (Social Welfare Department) अधिपत्याखाली असलेल्या आश्रमशाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सदर शिक्षिकेचा पगार अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. तो काढण्यासाठी वारंवार पाठपुरावा त्यांनी केला. यावर समाजकल्याण विभागात सेवक पदावर काम करणाऱ्या अशोक जाधव यांनी पाच लाख रुपये लाच मागितली.

याबाबत शिक्षिकेच्या पतीने सोलापूर एसीबीकडे (Solapur ACB Trap) तक्रार दिली. पथकाने पडताळणी केली असता पाच लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार विजापूर रोडवरील हॉटेल सिद्धेश्वर येथे सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून पाच लाख रुपये लाच घेताना अशोक जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले.
तर जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळेचा किसन भोसले हा पळून गेला.
याप्रकरणी दोघांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात (Vijapur Naka Police Station)
भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबीचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक (Police Inspector Umakant Mahadik),
पोलीस अंमलदार अतुल घाडगे, स्वप्नील सन्नके यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Solapur ACB Trap | a soldier demanded a bribe of rs 5 lakh to withdraw the teachers pending salary one of the social welfare department was detained

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

Income Tax Alert! जर बहुतांश व्यवहार कॅशने करत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकते नोटीस, जाणून घ्या नियम

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स