Solapur ACB Trap | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याला 2 लाख लाच स्वीकारताना अटक

सोलापूर: पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूरातील एका साखर कारखान्याच्या विरोधात नागरिकांनी तक्रार दिली होती. या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याने कारखान्याच्या प्रशासन अधिकाऱ्याकडे दोन लाखांची लाच मागितल्याचा प्रकार घडला (Solapur ACB Trap) आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अ‍ॅन्टी करप्शन विभागाने कारवाई करत लाचखोर उपप्रादेशिक (Solapur ACB Trap) अधिकाऱ्यास अटक केली.

अजित वसंतराव पाटील Ajit Vasantrao Patil (वय 50) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
त्यांच्याविरोधात सोलापूर साखर कारखान्याच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती.
लाचलुचपत विभागाच्या माहितीनुसार, अजित पाटील यांनी तक्रारदार यांना साखर कारखान्याच्या डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट परवाना नूतनीकरण करण्यास मदत केली होती. त्यांच्या मोबदल्यात तसेच कारखान्याकडून हवा व पाणी प्रदूषण होत असल्याने नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी, फार्मासिटीकल युनिटचे कनसेन्ट्स टू इस्टॅब्लिश या परवान्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी लाच मागितली होती. त्यानुसार लालचुतपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत लाचखोर अधिकारी अजित पाटील यांना दोन लाख लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

Web Title :- Solapur ACB Trap | Ajit Vasantrao Patil Sub-regional officer of Maharashtra Pollution Control Corporation arrested for accepting 2 lakh bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Urfi Javed | उर्फीला मुंबई पोलिसांनंतर दुबई पोलिसांचा दणका ! ‘या’ प्रकरणी केली अटक

Amol Mitkari | ‘नागपूरच्या आमदार निवासात कपबशा धुण्यासाठी शौचालयाचे पाणी’ – अमोल मिटकरी

Gold Price Today | ऐन लग्नसराईत सोन्याचे दर गगनाला भिडले ! GST सह सोनं प्रतितोळा 57 हजारांच्या घरात, चांदीही 70 हजार पार