Solapur ACB Trap | 25 हजार रुपये लाच घेताना मंडळ अधिकारी आणि कोतवाल अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur ACB Trap | वारस नोदींच्या (Heirs Record) हरकती अर्जावर सुनावणी करुन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी 25 हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) मंद्रूप अप्पर तहसिल कार्यालयातील (Mandrup Upper Tehsil Office) मंडल अधिकारी आणि कोतवाल यांना सोलापुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur ACB Trap) रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.20) सकाळी केली.

 

मंडळ अधिकारी (Circle Officer) मदनसिंग सुपडसिंग परदेशी Madan Singh Supad Singh Foreigner (वय- 35 रा.रा. सध्या, निर्मिती विहार विजापूर रोड सोलापूर मुळ रा. शिंदेबनवाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना), कोतवाल मल्लिनाथ रेवनसिध्द बाळगी Kotwal Mallinath Revansiddha Balgi (वय -36 रा. रा. घर नं. 215, सकळेश्वर गल्ली मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर) अशी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 48 वर्षीय व्यक्तीने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Solapur ACB Trap) तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी 2 आणि 5 ऑगस्ट रोजी पडताळणी करुन आज ही कारवाई केली.

 

तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी कार्यालय येथे  दिलेल्या वारस  नोंदीच्या हरकती अर्जावर सुनावणी घेवून तक्रारदार यांचे बाजूने निकाल देणेसाठी कोतवाल बाळगी याने मंडळ अधिकारी परदेशी यांच्यासाठी 25 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी सोलापूर एसीबीकडे तक्रार केल्यानंतर दोनवेळा पडताळणी करण्यात आली.

पथकाने पडताळणी केली असता कोतवाल बळगी यांनी मंडळ अधिकारी परदेशी
यांच्या करिता म्हणून तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रूपये लाचेची मागणी  केली.
तसेच त्याबाबत खात्री करून देणे करिता तक्रारदार यांचे मंडळ अधिकारी परदेशी यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले.
मंडळ अधिकारी परदेशी यांनी संमती दिली. परदेशी आणि बाळगी यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
सोलापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील (Deputy Superintendent of Police Sanjeev Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक (Police Inspector Umakant Mahadik),
पोलीस अंमलदार पोलीस हवालदार शिरिषकुमार सोनवणे, पोलीस नाईक अतुल घाडगे,
पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील सन्नके यांच्या पथकाने केली.

 

Advt.

Web Title :- Solapur ACB Trap | Board officials and Kotwals in anti-corruption net while taking Rs 25 thousand bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lumpy Virus | पिंपरी चिंचवड शहरी भागात लम्पीचा शिरकाव, पाच जनावरांना प्रादुर्भाव; आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आढावा

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Politics | पत्राचाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘शरद पवार हेच खरे रिंग मास्टर…’