Solapur ACB Trap | 20 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur ACB Trap | दारूबंदीच्या दाखल गुन्ह्यात जामीनासाठी आरोपीला मदत करतो म्हणून तीस हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती वीस हजार रुपये लाच घेणाऱ्या (Accepting Bribe) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) कर्मचाऱ्याला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur ACB Trap) रंगेहात पकडले आहे.

 

मलंग गुलाब तांबोळी (वय 32 रा. स्वामी विवेकानंद नगर, ओम गर्जना चौक, सैफुल, सोलापूर) असे या जवानाचे नाव आहे. सध्या उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैद्य दारू विक्रीवर (Selling Illegal Liquor) कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. अनेक ढाबा चालकांनी याचा धसका घेतला आहे. याच दरम्यान सोलापूर एसीबीने (Solapur ACB Trap) ही कारवाई केल्याने उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.

 

यातील तक्रारदाराच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई करुन दारूबंदी कायद्यांतर्गत (Liquor Prohibition Act) तक्रार दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तक्रारदार यांनी जामीन (Bail) मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. राज्य उत्पादन शुल्कच्या सोलापूर येथील कार्यरत असलेल्या मलंग तांबोळी यांनी या प्रकरणात मदत करण्यासाठी तीस हजार रुपये लाच मागितली.

 

तडजोडीअंती वीस हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांनी सोलापूर एसीबीकडे याबाबततक्रार केली.
पथकाने 14 ऑक्टोबर रोजी तक्रारीची पडताळणी केली. यामध्ये तथ्य आढळून आले.
सोमवारी रात्री उशिरा सापळा लावून तांबोळी यांना तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
त्यांच्यावर विजापूर नका पोलीस ठाण्यात (Bijapur Naka Police Station)
भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Solapur ACB Trap | Excise department employee in anti-corruption net while accepting bribe of 20 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाल्या-‘दादा नेमकं काय म्हणाले हे शांतपणे ऐकून घेतलं तर…’

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने ग्रुप अ‍ॅडमिनची जीभ कापली

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप