Solapur ACB Trap | 2 हजार रुपयांची लाच घेताना शाखा अभियंता अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सार्वजनिक बांधकामाचे बील तयार करुन देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच (Accepting Bribe) घेताना बार्शी येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील शाखा अभियंत्यास (ZP Engineer Barshi) सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur ACB Trap) रंगेहाथ पकडले. उपविभाग शाखा अभियंता अयूब दस्तगीर शेख (Ayyub Dastagir Shaikh) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. सोलापूर एसीबीच्या पथकाने (Solapur ACB Trap) ही करावाई मंगळवारी (दि.15) शेख यांच्या कार्यालयात सापळा रचून केली.
(Solapur) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील (Barshi Taluka) नारीवाडी येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करण्यात आले आहे. या कामाचे अंतिम मोजमाप घेऊन त्याचे बिल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी उपअभियंता यांचेकडे सादर करण्यासाठी शेख यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार लोकप्रतिनीधी यांनी सोलापूर एसीबीकडे तक्रार केली.
सोलापूर एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता आयुब शेख यांनी कामाचे बील तयार
करण्यासाठी दोन हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी बांधकाम उपविभाग बार्शी कार्यालयातील
शाखा अभियंता कक्षामध्ये सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना आयुब शेख यांना
रंगेहात पकडण्यात आले. शेख यांच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात (Barshi City Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत त्यांना बढती मिळणार होती. मात्र, त्याआधी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले. या कारवाई संदर्भात सोलापूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार (DySP Ganesh Kumbhar) यांनी माहिती दिली.
Web Title :- Solapur ACB Trap | Solapur ACB Trap Barshi Ayyub Dastagir Shaikh ZP Engineer Accepting Bribe
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती