सोलापूरमधील आणखी एका महाराजांची राजकारणात ‘एन्ट्री’, काँग्रेसकडं ‘तिकीट’ मागितलं !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यानंतर आता एक महाराज राजकारणात येण्यास तयार आहे. श्रीकंठ शिवाचार्य खासदार जयशिद्धेश्वर शिवाचार्य यांचे विश्वासु हे काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. श्रीकंठ शीवाचार्य हे लोकसभा निवडणुकीवेळी सोलापुर जिल्ह्याचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यासोबत कायम होते. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांना जयसिद्धेश्वर यांचे विश्वासु सहकारी म्हणुन ओळखले जातात. आता ते ही राजकारणात उत्सुक झाले आहेत.

श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील मठाचे मठाधिपती आहेत. त्यांनी काँग्रेसकडून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातुन निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेस भवनात पण त्यांनी उमेदवारी मागण्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळे राजकारणात आता आणखी एका महाराजाचा प्रवेश झाल्याची च्रर्चा आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून इच्छुक आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागवले जात आहे. अक्कलकोट येथील काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे काँग्रेसकडून निवडणुक लढविण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरसुर मठाचे मठाधिपाती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी याना काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा आहे. श्राकंठ शिवाचार्य महास्वामी हे विधमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे विश्वासु मानले जातात. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना निवडुण आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

महत्वाच म्हणजे श्रीकंठ महास्वामी हे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि त्यांना मुबंईला मुख्यमंत्र्याकडे घेउन जाण्यासाठी आग्रही होते. दरम्यान त्यामुळे आता आणखी एका महाराजांचा राजकारणामध्ये प्रवेश निश्चीत असल्याच मानल जात आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात