Solapur Band | आज सोलापूर बंद; महाविकास आघाडीचा पाठिंबा

0
154
Solapur Band | solapur band call today to protest controversial statements about chhatrapati shivaji maharaj b r ambedkar by bjp leaders
file photo

सोलापूर: पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Band | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपुरुषांच्या केलेल्या अपमानाविरोधात आज (दि. 16 डिसेंबर) सोलापूर बंदची (Solapur Band) हाक देण्यात आली आहे. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने हा सोलापूर बंद (Solapur Closed Down) पुकारला आहे. या बंदला महाविकास आघाडीने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. या बंदमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघ आणि अनेक संस्था स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असल्याचे मंडळाचे उत्सव अध्यक्ष शेखर फंड यांनी सांगितले.

सोलापूर बंदला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, प्रहार संघटना आणि विविध व्यापारी संघटनांचा देखील बंदला पाठिंबा आहे. बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केला आहे. बंद यशस्वी करण्यासाठी किंवा बंदला विरोध करण्यासाठी कोणत्याही नागरिक किंवा व्यापाऱ्यांना बळजबरी करण्यात येऊ नये, अशा सूचना पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Solapur Band)

सकाळी नऊ वाजता सुरू झालेला हा बंद दुपारी दोन वाजेपर्यंत पाळण्यात येणार आहे.
सकाळी 9 वाजता शहराच्या सम्राट चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून
बंदची सुरुवात झाली. त्यानंतर अनेक संघटना, पक्षांचे कार्यकर्ते शिवाजी चौकात जमा झाले आणि
सुपर मार्केटमधील महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ
दुपारी दोन वाजता अभिवादन रॅलीची समाप्ती होईल. त्यामुळे शहरवासीयांनी दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक
सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन शिवजन्मोत्सव मंडळाने केले आहे.

भाजप नेत्यांच्या विरोधात पुकारलेला हा दुसरा बंद आहे.
यापूर्वी 13 डिसेंबर रोजी पुणे शहरात विविध संघटनांच्या वतीने पुणे बंद पाळण्यात आला होता.
या बंदला देखील महविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. तसेच येत्या 17 डिसेंबर रोजी मुंबईत
महाविकास आघाडीचा महामोर्चा आयोजित केला आहे.

Web Title :- Solapur Band | solapur band call today to protest controversial statements about chhatrapati shivaji maharaj b r ambedkar by bjp leaders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Samruddhi Highway | समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, कार जळून खाक; पुण्यातील कुटुंब थोडक्यात बचावलं

Thackeray Group | नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; ‘राऊतांची पाठ फिरली अन् नगरसेवक देखील फिरले…’

MP Sanjay Raut | भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे, संजय राऊतांचे चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर