अमित शाहांनी सोलापूरमध्ये ‘या’ 6 नेत्यांशी केली बंद खोलीत चर्चा !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल सोलापूरमध्ये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रेचा काल सोलापूरमध्ये समारोप झाला. यावेळी अमित शहा बोलत होते.

भाजपने जर पक्षाचं दार पूर्ण उघडलं तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय राष्ट्रवादीत कोणीच उरणार नाही, अशी जहरी टीका त्यांनी विरोधी पक्षावर केली. त्यानंतर त्यांनी सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी तीन तास महत्वाची बैठक घेतली.

सहा जणांमध्ये चर्चा
या सभेत माजी खासदार धंनजय महाडिक, आमदार जयकुमार गोरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रात्री अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बैठक घेतली. त्याचबरोबर या बैठकीत प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, राज्य सहसंघटक व्ही. सतिश, महाराष्ट्रचे प्रभारी भूपेंद्रसिंह यादव यांचा देखील समावेश होता. त्यामुळे या नेत्यांमध्ये काय चर्चा रंगली याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्याचबरोबर सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्वाच्या नेत्यांना दूर ठेवण्यात आले होते.

या सभेत काय टीका केली
या यात्रेत अमित शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका करत शरद पवार यांना आव्हान दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, भाजपने जर पक्षाचं दार पूर्ण उघडलं तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय विरोधी पक्षात कोणीच उरणार नाही,अशी जहरी टीका त्यांनी विरोधी पक्षावर केली. त्याचबरोबर शहा म्हणाले कि, भाजपने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी हि यात्रा काढली असून आघाडीमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मागील पंधरा वर्षात काय केले हे सांगावे.

आरोग्यविषयक वृत्त –