‘या’ कारणामुळं आमदार प्रणिती शिंदेंना पोलीस स्टेशनमध्ये व्हावे लागले हजर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी बझार पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. प्रणिती शिंदे यांना जामीन मंजूर करत कोर्टाने १६ ते १८ सप्टेंबर पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.कोर्टाच्या आदेशाचे पालन करत प्रणिती शिंदे यांनी बझार पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली.

सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीला हे सरकार मेंटली टॉर्चर करत आहे, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला आहे. आम्ही औषधांच्या किमतींविरोधात आवाज उठवत होतो त्यावेळी माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. तसेच असे कितीही गुन्हे दाखल केले तरी सर्वसामान्यांसाठी आवाज उठवत राहणार असल्याचे शिंदे म्हणाल्या.

काय आहे नेमकं प्रकरण
हे प्रकरण गेल्या वर्षी २ जानेवारी २०१८ रोजीचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख येत असताना आमदार प्रणिती शिंदे आणि कार्यकर्त्यांनी पालक मंत्र्यांना घेराव घातला. त्यावेळी सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून प्रणिती शिंदे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आमदार प्रणिती शिंदे सुनावणीला हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात जामिनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. त्यानंतर शिंदे या कोर्टात हजर राहिल्याने त्यांना अंतरिम जामीन मंजूर करत कोर्टाने तीन दिवस म्हणजे १६ ते १८ सप्टेंबरपर्यत सदर बझार पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like