Solapur Crime | दुर्दैवी ! शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील शेटफळ (Shetfal) येथे एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू (Died) झाल्याची दुर्दैवी घटना (Solapur Crime) घडली आहे. शेततळ्याच्या शेजारी खेळताना तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. कार्तिकेश हिंगमीरे (Karthikesh Hingmire), सिद्धार्थ निकम (Siddharth Nikam), विनायक निकम (Vinayak Nikam) अशी मृत्यू झालेल्या बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील निकम कुटुंब (Nikam Family) हे शेटफळ येथील डोंगरे या शेतकऱ्याच्या शेतात सालाने कामाला आहेत. तर हिंगमीरे हे शेटफळ येथीलच कुटुंब (Hingmire Family) आहे, सोमवारी डोंगरे यांच्या शेतात डाळिंब तोडणीचे काम सुरू होते. त्यावेळी तिन्ही बालके शेततळ्याच्या शेजारी खेळत होती, ते बराच वेळ दिसली नाहीत, त्यांचा शोध घेतला असता शेततळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. (Solapur Crime)

दरम्यान, तिन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू (Died) झाला. ही घटना 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मोहोळ ग्रामीण रुग्णालयात (Mohol Rural Hospital) या तीनही बालकांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title : Solapur Crime | 3-children-die-after-falling-in-a-field-incidents-in-shetfal of solapur district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा