Solapur Crime | दुर्देवी ! मोहोळजवळ भीषण अपघातात पोलिस कर्मचार्‍यासह दोघे जागीच ठार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | पंढरपूर (Pandharpur) येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला. मोहोळ-पंढरपूर मार्गावरील (Mohol-Pandharpur Road) सारोळे पाटी (Sarole Pati) नजीक झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर कुटुंबातील इतर चार सदस्य गंभीर जखमी (Seriously Injured) झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार (Solapur Crime) सुरु आहेत.

 

दयानंद बेल्लाळे (Dayanand Bellale) आणि सचिन बेल्लाळे (Sachin Bellale) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दयानंद बेल्लाळे हे सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात (Solapur Rural Police Headquarters) कार्यरत होते. तर दोन महिला आणि दोन मुले यामध्ये जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर येथून आपल्या ओमनी कारने बल्लाळे कुटुंब घरी परतत होते. मात्र, सारोळे पाटी जवळ उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या ओमनी कारने जोरात धडक दिली. यामध्ये पुढे बसलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. (Solapur Crime)

 

या अपघातानंतर मोहोळ पोलिस (Mohol Police) घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रूग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.

 

Web Title :- Solapur Crime | Bad luck! Two persons, including a policeman, were killed on the spot in a tragic accident near Mohol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nagpur Crime | धक्कादायक ! युट्यूबवर व्हिडीओ पाहून 5 महिन्यांच्या 17 वर्षीय गर्भवती तरूणीनं केला गर्भपात

 

Tata Group Stock | टाटाच्या ‘या’ कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखाचे झाले 18 लाख, जाणून घ्या

 

Rahul Gandhi-Pushpa Munjiyal | काय सांगता ! होय, 78 वर्षाच्या महिलेनं राहुल गांधींच्या नावे केली संपूर्ण संपत्ती, जाणून घ्या