Solapur Crime | धक्कादायक ! 10 वीत कमी गुण पडतील या भीतीने विद्यार्थिनीने केली आत्महत्या; पण..मिळाले 81 टक्के

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | दहावी बोर्डाच्या परीक्षेत कमी गुण मिळतील या भीतीने माढा तालुक्यात घोटी (Ghoti) येथे एका विद्यार्थिनीने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना (Solapur Crime) घडली आहे. परंतु, काल झालेल्या निकालामध्ये तिला 81 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण (Passed) झाल्याची माहिती समोर येत आहे. अमृता दाजीराम लोंढे (Amrita Dajiram Londhe) (वय, 17, रा. घोटी, ता. माढा) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना काल (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली.

 

याबाबत माहिती अशी की, अमृता लोंढे हिने एप्रिल 2022 मध्ये 10 वीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत तिला अपेक्षेप्रमाणे गुण मिळतील की नाही याबद्दल तिला शंका होता. त्यामुळे ती सतत तणावाखाली होती, तसेच गुण कमी मिळाल्यास लोक काय म्हणतील या भीतीने ती वावरत होती. ही गोष्ट तिच्या आई-वडिलांनाही जाणवत होती. अशावेळी तिच्या माता-पित्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण, याचा काहीही उपयोग झाला नाही. (Solapur Crime)

 

दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री ती कुणालाही काही न सांगता ती घराबाहेर पडली. घरात ती दिसत नसल्याने नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. पण, तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घरापासून 2 किलोमीटर अंतरावर शिवराम मोहन लोंढे (Shivram Mohan Londhe) यांच्या शेतातील शेततळ्यात पाण्यावर तिचा मृतदेह तरंगताना आढळला. याबाबत माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात (Tembhurni Police Station) नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title :- Solapur Crime | fear of low marks in 10th class student commits suicide got 81 percent

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल होणार; रविवारी शस्त्रक्रिया

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

 

Jammu And Kashmir Police | जम्मू-काश्मीरात PSI ची हत्या; अपहरणानंतर दहशतवाद्यांनी केलं ठार