Solapur Crime | तरुणीने रचला कट, लॉजवर बोलवून तरुणाचे काढले अश्लील फोटो, मागितली खंडणी; पण…

सोलापूर : Solapur Crime | एका तरुणीने तरुणाला लॉजवर नेऊन त्याचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो (Nude Photos) काढले. यानंतर आपल्यावर अत्याचार केल्याची खोटी तक्रार करण्याची धमकी (Threat) देत त्याच्याकडून 25 हजार रुपयांची खंडणी (Ransom) मागितली. परंतु, तरुणाने पैसे नसल्याचे सांगितले आणि त्यानंतर आलेल्या पोलिसांना सर्व प्रकार सांगितल्याने तरुणीचा कट उघडकीस आला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीसह तिच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. (Solapur Crime)

27 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तातडीने कारवाई केली. 28 वर्षीय आरोपी नितीन शिंदे (Nitin Shinde) आणि संबंधित तरुणीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तिला 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

तडवळे यावली येथे 5 ऑक्टोबर रोजी भगवती देवीची यात्रा झाली. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील काही तरुणी नृत्य करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी संबंधित तरुणीने पीडित तरुणाचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तरुणीने तरुणाला गुरुवारी (ता. 27) सकाळी 10 वाजता फोन केला होता. तू कुठे आहेस? मी बार्शीला आलेय, तू शिवाजी कॉलेजजवळ ये, असे तिने तक्रारदार तरुणाला सांगितले. दुपारी बारा वाजता तरुण तिथे गेला असता, पुन्हा तरुणीने फोन केला. मी शिवाजी चौकातील कुर्डूवाडी रोडवर उभी आहे, असे सांगत तिने पीडित तरुणाला चहा घेण्याच्या बहाण्याने एका लॉजवर नेले. (Solapur Crime)

लॉजवर गेल्यानंतर तरुणीने आधी त्याचा अर्धनग्न फोटो काढला. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत
त्याच्याकडे 25 हजार रुपयांची खंडणीची मागितली. पैसे दिले नाहीस, तर तू माझ्यावर अत्याचार केलास,
असे ओरडून सांगण्याची धमकी दिली. तरुणीच्या या कृत्याने घाबरलेल्या या तरुणाने आपल्याकडे पैसे नसल्याचे
सांगितले. त्यावर आत्ता जवळ जितके आहेत, तितके दे असे तरुणीने सांगताच तरुणाने तिला पाचशे रुपये
ऑनलाईन ट्रान्सफर केले.

दरम्यान, पोलीसही त्याच वेळी लॉजवर आले आणि त्यांनी तरुणीला पळवून आणल्याचे सांगत तरुणाला
तिच्यासह ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांनाही पोलीस स्टेशनला नेले असता,
तरुणाने आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणीसह तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Web Title :-  Solapur Crime | maharashtra crime news solapur barshi lady honeytrap blackmail youth demands 25 thousand man saved police booked girl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tata Airbus | टाटा एअरबस प्रकल्पावरून सत्ताधार्‍यांचीच विरोधकांना धमकी, ‘या’ नेत्यांची नार्को टेस्ट करा, सर्व गुपिते समोर येतील

Avadhoot Gupte | अवधूत गुप्ते भाजपच्या विद्यमान मंत्र्यावर चित्रपट काढणार

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खोकेवाले आमदार म्हणतात हे दु:ख, काही आमदारांनी मला फोन करून…’