Solapur Crime | करमाळा बलात्कार प्रकरणात मनोहर भोसलेला तब्बल ‘एवढया’ दिवसाची पोलिस कोठडी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Solapur Crime | मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला करमाळा कोर्टाकडून (Karmala Court) 7 दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. त्यामुळे येत्या 27 सप्टेंबरपर्यंत मनोहर भोसले (Manohar Bhosle) पोलीस कोठडीत राहणार आहे. बलात्कार आणि फसवणुकीच्या (Solapur Crime) आरोपाखाली (Allegations of rape and fraud) मनोहर भोसलेला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. कालच करमाळा पोलिसांनी मनोहर मामाला ताब्यात घेतलं. यांनतर आता करमाळा कोर्टाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले याला बारामती पोलिसांनी (Baramati police) सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर दोनवेळा भोसलेला बारामती कोर्टाने पोलिस कोठडी दिली होती. रविवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर भोसलेला कोर्टात हजर केले. त्यावेळी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. तसेच, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मनोहर भोसलेला करमाळा पोलिसांनी (Karmala Police) ताब्यात घेऊन अटक करुन न्यायालयात हजर केले. न्या. आर.ए.शिवरात्री (Justice R.A. Shivaratri) यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, 7 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे ॲड . सचिन लुणावत (Adv. Sachin Lunawat) यांनी काम युक्तीवाद केला.

 

दरम्यान, एका मालिकेत काम देतो असे सांगत पिडीतेवर अत्याचार केलेला आहे, असा मनोहर भोसलेवर आरोप आहे. या गुन्हातील कपडे जप्त करणे, चिट्टी जप्त करणे अशा 17 कारणांचा दिली आहेत. त्याचा तपास करण्यासाठी दहा दिवस तपास अधिकारी कोकणे यांनी पोलिस कोठडी मागितली होती. ॲड. लुणावत यांनी सरकारकडून बाजू मांडली. अद्याप दोघे आरोपी फरार आहेत. त्यांचा तपास करायचा आहे असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, भोसलेच्या वकीलांकडून न्यायालयीन कोठडी मागण्यात आली होती. ॲड. हेमंत नरुटे (Adv. Hemant Narute) आणि ॲड. विजय गायकवाड (Adv. Vijay Gaikwad) यांनी संशयित आरोपीकडून बाजू मांडली.

 

Web Title : Solapur Crime | Manohar Bhosle remanded in police custody for 7 days in Karmala rape case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | मुश्रीफांच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार, म्हणाले – ‘आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत’

Maharashtra Rains | आगामी 3 दिवसात मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस ‘कोसळणार’ !

Chandrakant Patil | ‘मुश्रीफ यांनी ड्रामा बंद करावा’ – चंद्रकांत पाटील