Solapur Crime | धक्कादायक ! मोबाईलवरील अश्लील व्हिडीओपाहून चेकाळलेल्या पतीनं धरला वेगळाच ‘हट्ट’, पत्नीनं घेतली पोलिसांत धाव

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | करमाळा (Karmala) तालुक्यातील एक विचित्र घटना समोर (Solapur Crime) आली आहे. पती मोबाईलवरील अश्‍लील व्हिडिओ (Pornographic videos) पाहून मोबाईलवरील व्हिडिओप्रमाणेच शरीरसंबंध करण्याचा आग्रह करायचा. याला विरोध केला तर मोबाईलवरील व्हिडिओप्रमाणेच शरीरसंबंध का ठेवू देत नाहीस यामुळे शिवीगाळ करून मारहाण करायचा. तसेच माहेरहून 9 लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत असत. या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने थेट पोलिस ठाण्यात (Karmala Police Station) तक्रार दिली आहे. यावरुन गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी, विवाहित तरुणी ही करमाळा तालुक्यातील जेऊर येथे राहते. विवाहितेचा पती नीरा येथील एका कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्यांचा विवाह झाल्यापासून पंधरा दिवस संसार व्यवस्थित सुरू होता. त्यानंतर पती व सासू यांनी घरातील कामकाज व किरकोळ कारणावरून टोचुन बोलणे आणि तुझ्या आई- वडिलांनी लग्नामध्ये पाहुणचार केला नाही, सोने कमी दिले, घरातील संसारोपयोगी वस्तू संपूर्ण दिलेल्या नाहीत. अशा कारणावरुन विवाहितेला त्रास देणे सुरु केले. तसेच, विवाहित पीडितेला तू या घरात राहायचे नाही, हे घर माझे आहे, असे म्हणून पती व मामा धमकी देत होते. (Solapur Crime)

 

 

तसेच नंणद देखील विवाहितेला शिवीगाळ करायची. फिर्यादीनूसार, पती व सासूला या दोन्ही नणंद या माझ्याशी व्यवस्थित वागायचे नाही,
असे शिकवण देत असत. तसेच पती मोबाईलवरील अश्‍लील व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे तो शरीरसंबंध करण्याचा हट्ट करीत असे.
त्यास विरोध केल्यास त्या कारणावरून तो शिवीगाळ करून मारहाण करून मला वारंवार त्रास देत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच, जाचहाट करून शिवागीळ व दमदाटी करून तुला सोडचिठ्ठी देतो असे म्हणून घरातून हाकलून दिले, असं देखील फिर्यादीत म्हटले आहे.

 

दरम्यान, यावरुन पीडित विवाहित महिला मार्च 2021 पासून आई वडिलांकडे रहात आहे.
करमाळा पोलिस ठाणे (Karmala Police Station) अंकित जेऊर दूरक्षेत्र येथे रविवारी (21 नोव्हेंबर) रोजी गुन्हा (Solapur Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Solapur Crime | married woman lodged a complaint against her husband at the karmala police station-for different demand of husband

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा