Solapur Crime News | सोलापूर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरची हॉस्टेलच्या टेरेसवर आत्महत्या, परिसरात खळबळ

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime News | सोलापूर शासकीय रुग्णालयातील (Solapur Government Hospital) डॉक्टरने हॉस्टेलच्या टेरेसवर आत्महत्या केल्याची (Doctor Commits Suicide) धक्कादायक घटना घडली आहे. गौरव राजू वखारे Gaurav Raju Vakhare (वय- 25, रा. विवेकानंद नगर, भगवान बाबा चौक, अंबोजोगाई, ता. बीड) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ (Solapur Crime News) उडाली आहे.

 

गौरव वखारे या डॉक्टरने सोलापूर शासकीय रुग्णालयातील हॉस्टेलच्या (Hostel) टेरेसवर जाऊन आत्महत्या केली.
ही घटना मंगळवारी (दि.14) दुपारी एकच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती मिळताच शासकीय रूग्णालयातील हॉस्टेल परिसरातील शहर पोलिसांनी (Solapur City Police) घटनास्थळी धाव घेतली.
तर घटनास्थळावर डॉक्टरांनी मोठी गर्दी केली. (Solapur Crime News)

 

गौरव वखारे याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
मयत गौरव हा बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून मागील काही वर्षापासून तो शासकीय रूग्णालयात डॉक्टर पदवीचे शिक्षण घेत आहेत.
त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.

 

Web Title :- Solapur Crime News | A doctor of Solapur Government Hospital committed suicide on the terrace of the hostel, excitement in the area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PNB Scam | फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या पुण्यातील फ्लॅटला ग्राहक मिळेना, किंमती कमी करुन पुन्हा लिलाव; जाणून घ्या फ्लॅटची किंमत

Mumbai Heat Wave | मुंबई, पुण्यासह कोकणात पुढच्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता

Valentine’s Day | प्रेमासाठी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी केली हद्द पार; कोणाकोणाचा आहे समावेश