Solapur Crime News | शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला दुचाकीची धडक, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

सांगोला/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime News | शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shinde Group MLA Shahajibapu Patil) यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला (Police Vehicle) अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू (Death) झाला तर त्याचा जोडीदार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना (Solapur Crime News) गुरुवारी (दि.9) दुपारी साडेचारच्या सुमारास सांगोला तालुक्यातील माळवाडी-नाझरे दरम्यान घडली.

 

अशोक नाना वाघमारे (वय-50 माडगुळे, ता. आटपाडी, जि. सांगली) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर त्यांच्या सोबत पाठिमागे बसलेले नाना आमोणे (रा. एखतपूर, ता. सांगोला) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणाऱ्या सांगोला ग्रामीण रुग्णालयातील (Sangola Rural Hospital) सूत्रांनी सांगितले. (Solapur Crime News)

 

शहाजीबापू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त नाझरे येथे
आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास भेट देण्यासाठी गेले होते.
तेथून सांगोल्याकडे परत येत असताना नाझरे गावच्या पुढे त्यांच्या गाडीपुढे संरक्षणासाठी असलेल्या
पोलिसांच्या स्कार्पिओ गाडीवर समोर विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी आदळली.
यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला असून शहाजीबापू यांच्या ताफ्यातील कोणालाही इजा झालेली नाही.

 

Web Title :- Solapur Crime News | balasaheb shivsena mla shahajibapu patil convoy met with an accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | शनिवारी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होणार महारोजगार मेळावा, विवाह संस्कार मेळावा

Chinchwad Bypoll Election | ‘मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश पाहिजे’; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले

Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या