Solapur Crime News | जादूटोण्याच्या नावाखाली मांत्रिकाकडून व्यापाऱ्याची फसवणूक; सोलापूरमधील घटना

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Solapur Crime News | आपला देश कितीही पुढे गेला असला तरी अजूनही खेडेगावामध्ये अंधश्रद्धा कायम आहे. अशीच एक घटना सोलापूरमध्ये उघडकीस आली आहे. यामध्ये अडलेली कामे जादूटोणा (Black Magic) करून सुरळीत होतील असं सांगत मांत्रिकाने एका व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी भिवंडीतुन 6 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून जादूटोणाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या मांत्रिकांनी व्यापाऱ्याला 70 लाखांचा गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यापाऱ्याने पोलिसांना याची माहिती दिली. (Solapur Crime News)

काय आहे प्रकरण?

भिवंडी परिसरातल्या मांत्रिकासह सहा जणांनी व्यापाऱ्याला जादूटोणा करून तुमची कामे करून देतो असे आमिष दाखवले. या मांत्रिकाने व्यापाऱ्याला सांगितले कि पावडर रेडिए एक्टिव्ह आहे. त्यासाठी विशेष सूटही मांत्रिकाने आणले होते. हात न लावता कुलूप उघडून दाखवतो असे सांगितले. मात्र कुलूप न उघडल्याने भांडे फुटू नये म्हणून मांत्रिकाने अमेरिकेतून पावडर मागवावी लागेल असे सांगितले.

यानंतर व्यापाऱ्याला संशय आला आणि त्याने आपली फसवणूक होत असल्याचे पोलिसांना सांगितले.
यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे कारवाई करून मांत्रिकासह सहा जणांना अटक केली.
तसेच त्यांनी एक फॉर्च्युनर, इनोव्हा, तवेरा आणि एक गाडी ताब्यात घेतली. फिर्यादी हे अकलूज येथील रहिवाशी आहेत.

Web Title : Solapur Crime News | man cheated a businessman of 70 lakhs for black magic in akluj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime News | इमारतीच्या छतावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; मुंबईमधील घटना

Wardha Crime News | खळबळजनक ! पोलिस अधिकार्‍यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

Solapur Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pravin Tarde | प्रवीण तरडे यांना ’कलाजीवन गौरव’ पुरस्कार