Solapur Crime News | पांगरी स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी नाना पाटेकरला तमिळनाडूमधून अटक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Solapur Crime News | या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पांगरी येथे फटाका फॅक्टरीला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये फटाका फॅक्टरीत काम करणाऱ्या पाच महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर 3 महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. या स्फोट प्रकरणी फटाका फॅक्टरी मालकाविरोधात पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Solapur Crime News) आला होता.

 

या फटका फॅक्टरीला आग लागून एक महिना उलटला तरी मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. या प्रकरणातील मुख्य आरोपी नाना पाटेकर हा गेल्या महिनाभरापासून पोलिसांना चकवा देत होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने एक पथक तयार केले होते. अखेर या पथकाने या प्रकरणातील मुख्य आरोपी नाना पाटेकर याला तमिळनाडू येथून अटक केली आहे. (Solapur Crime News)

 

कशाप्रकारे केली अटक ?

नाना पाटेकर हा तमिळनाडूला पळून गेल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. खबऱ्याने दिलेली माहिती आणि तांत्रिक बाबींच्या तापासाच्या आधारे सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक तामिळनाडूला रवाना झाले. यावेळी नाना पाटेकर हा तामिळनाडू राज्यातील कोईम्बतुर, मदुराई, शिवकाशी या जिल्ह्यात वास्तव्याला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी नाना पाटेकरला तामिळनाडू येथून अटक केली. त्याला बार्शी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Solapur Crime News | nana patekar finally arrested from tamil nadu in pangri blast case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा