Solapur Crime | गांजातस्करांची नवी युक्ती; हैदराबादमधून आलेला गांजा पुणे कस्टमकडून जप्त

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | वेगवेगळ्या मार्गांनी गांजाची तस्करी करण्यात येत असताना तस्करांनी आता थेट परिवहन मंडळाच्या गाडीचा उपयोग केल्याचे समोर आले आहे. हैदराबाद परिवहन महामंडळच्या बसमधून गांजा घेऊन येणाऱ्या तिघांना केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने (कस्टम) सोलापूर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 56 किलो गांजा जप्त केला आहे. हैदराबादमधील गांजा महाराष्ट्रात विक्रीसाठी (Solapur Crime) पाठवण्यात येणार असल्याची माहिती कस्टमच्या पुणे कार्यालयाला मिळाली.

 

हैदराबाद परिवहन महामंडळाच्या बसमधून गांजा सोलापूर परिसरात पाठवला जाणार असल्याची माहिती कस्टमच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथक सोलापूर येथे रवाना झाले. पथकाने बसचा पाठलाग करून बस आडवली व तपासणी केली असता, त्यामध्ये गांजा आढळून आला. गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करून पोत्यात ठेवलेला 56 किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती कस्टमच्या पुणे विभाग कार्यालयाचे उपायुक्त सचिन घागरे यांनी दिली. (Solapur Crime)

 

मागील काही वर्षांपासून गांजातस्करांनी तस्करीसाठी महागड्या गाड्यांचा वापर केला होता.
यापूर्वी प्रवासी ट्रेनच्या स्लीपर कोचमधून गांजाची तस्करी केली जात होती.
मात्र, आता परिवहन महामंडळाच्या गाडीचा वापर केल्याने गांजातस्कर गांजाची तस्करी
करण्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करतील याचा नेम नाही.

 

Web Title :- Solapur Crime | pune customs seize 56 kg ganja bought from hyderabad transport corporation bus in solapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार

Nashik Crime | पैशांसाठी नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या; नाशिकमधील प्रकार

Pune Pimpri Crime | दुधिवरे खिंडीत सहलीतील विद्यार्थ्यांची बस खोल दरीत कोसळली; 3 जण गंभीर जखमी