Solapur Crime | कामगार मंत्र्यांचीच हकालपट्टीची मागणी करणारा खंडणीखोर अटकेत

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | वारंवार वरीष्ठ कार्यालयाकडे निराधार तक्रारी, नोटीसा, विविध अर्ज करून सहायक कामगार आयुक्त सोलापूर निलेश येलगुंडे (Assistant Labor Commissioner Nilesh Yelgunde) यांना बदनाम (Solapur Crime) केले. तसेच सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी दहा लाखाची खंडणी (Ransom) मागितली. याप्रकरणी गणेश ज्ञानोबा बोड्डू (रा. जुना विडी घरकूल, हैदराबाद रोड, सोलापूर) याचेवर गुन्हा दाखल करून त्याला फौजदार चावडी पोलीसांनी (Faujdar Chawdi police) अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे सहायक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने या बोड्डूने थेट राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांचीच हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 5) फिर्यादी हे कार्यालयीन कामकाज करत असताना आरोपी गणेश बोड्डु हा कार्यालयात आला. त्याने तुम्ही माझं काहीच ऐकत नाही, तुम्हाला कितीदा निरोप द्यायचा तुम्ही माझे ऐकणार नसला तर तुमच्याकडे बघावे लागेल अशी धमकी दिली. तसेच मी तुमच्या मंत्रालयाला कामाला लावले आहे. तुमचा तो हसन मुश्रीफ आणि त्या बच्चू कडूचीच हाकालपट्ट करा अशी मी मागणी केल्याचे सांगत फिर्यादी यांना धमकी दिली. तसेच माझ्याकडून काही त्रास नको असले तर 10 लाख रुपये द्या व मला दर महिन्याला 50 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे म्हणत खंडणी मागितली.

सहायक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांच्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलीसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला. गणेश बोड्डू याला शुक्रवारी (दि. 6) अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Solapur Crime | Ransom seeker arrested demanding dismissal of Labor Minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cold Drink पिल्यानंतर श्वास कोंडल्याने झाला 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, Postmortem मध्ये झाला खुलासा

Adar Poonawala | अदर पुनावाला यांची मोठी घोषणा ! ‘Covovax ऑक्टोबरमध्ये तर लहान मुलांसाठीची लस 2022 मध्ये’

Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरुच, सोन्याचा दर 47 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या आजचा दर