Solapur Crime | कारवाईसाठी गेल्यानंतर वाळू माफियानं पोलिस कर्मचार्‍याला चिरडलं, जागीच मृत्यू झाल्यानंतर खळबळ

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – वाळू तस्करांवर (sand smuggler) कारवाईसाठी गेलेल्या पोलीस (police) कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घाडून त्याला चिरडल्याची (crushes) धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात (Solapur Crime) घडली आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात (Solapur Crime) मोठी खळबळ उडाली असून वाळू माफियांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा (Mangalwedha) येथे घडली आहे. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू (death) झाला आहे.

गणेश सोनलकर (Ganesh Sonalkar) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या प्रशासकीय कर्मचारी आणि पोलिसांवर वारंवार अशाप्रकारे हल्ले होत असून आज याची पुनरावृत्ती झाली. मंगळवेढ्यातील गोणेवाडी येथे वाळू चोरी होत असल्याची माहिती गणेश सोनलकर यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर मुजोर वाळू तस्करांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू (Solapur Crime) झाला.

सोलापूर जिल्ह्यामध्ये वाळूचे कोणतेही लिलाव झाले नाही.
त्यामुळे रोजचं भीमा नदीच्या (Bhima River) पात्रातून राजरोसपणे बेकायदा पद्धतीने वाळू उपसा सुरु असतो.
पोलीस, महसूल कर्मचारी (Revenue staff) कारवाई करण्यासाठी गेल्यावर त्यांच्यावर वाळू तस्करांकडून थेट अंगावर गाडी घालण्यात येते.
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Web Titel :-  Solapur Crime | sand smuggler crushes policeman death on the spot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Freelance Professionals | फ्रीलान्स करत असाल काम तर द्यावा लागू शकतो GST, जाणून घ्या या आवश्यक तरतूदी

Pune Crime | 36 वर्षीय शिक्षिकेशी ‘हुशार’ वकिलाचं FB वर जुळलं ‘सूत’, 5 वर्ष ‘धुमाकूळ’ घालत ‘संबंध’ ठेवल्यानंतर दिला ‘धोका’, पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

PMC Lok Adalat | पुणे महापालिकेतील लोक अदालतीमध्ये 1369 केसेस निकाली; ‘इतक्या’ लाखाची थकित रक्कम वसुल