Solapur Crime | धक्कादायक ! पोलिस ठाण्याच्या परिसरातच 16 वर्षीय मुलावर खूनी हल्ला

बार्शी (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाइन  –  Solapur Crime | भांडणाची तक्रार देण्यासाठी कुटुबांसह बार्शी शहर पोलीस ठाण्यात (Barshi city police station) आलेल्या एका अल्पवयीन मुलाला सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न (Solapur Crime) केल्याची घटना घडली. रविवारी ही घटना घडली असून एका तरुणास या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

गणेश विठ्ठल आगलावे (Ganesh Vitthal Aaglave) (वय २४, रा. मांगडे चाळ, तुळजापूर रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवराज धोत्रे (Shivraj Dhotre) (वय १६, रा. मांगडे चाळ) याने फिर्याद दाखल केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील तुळजापूर रोडवर (Tuljapur Road) मांगडे चाळ आहे.
रविवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान गणेश आगलावे, राहुल नलावडे, हरीश वडेकर यांच्यामध्ये मोठे भांडण व शिवीगाळ धोत्रे यांच्या घरासमोर सुरू होती.
यावेळी शिवराज धोत्रे याने येथे माझ्या घरामध्ये आई, बहीण आहेत, तुम्ही घाण, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू नका सांगितले त्यावरून शिवराज यास तू फार शहाणा आहेस
म्हणून हाताने मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आई, बहीण, आत्या यांच्यासह शिवराज तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात आला होता.
समोरची तक्रार घेतल्यानंतर तुमची तक्रार घेतो.

 

आपण सर्वजण आवारातील बाकड्यावर बस असे पोलिसांनी धोत्रे कुटूंबियांना सांगितले. त्यानुसार धोत्रे णून उठला व बाजूला असलेला सिमेंटकुटुंबीय पोलीस ठाण्याच्या आवारात तेथे बसले होते.
त्यावेळी तेथे गणेश आई वडिलांसह आला. धोत्रे कुटुंबीयांच्या शेजारील बाकड्यावर ते बसले होते.
गणेशने शिवराजकडे पाहून तुला बघतोच असे म्हचा गट्टू शिवराजच्या डोक्‍यात घालण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी शिवराज मोठ्याने ओरडून पळाला. या हल्ल्यात शिवराज गंभीर जखमी (Solapur Crime) झाला आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसट (PSI Shirsat) करीत आहेत.

 

Web Title : Solapur Crime | Shocking! attempt to murder of 16 year old boy in the vicinity of the barshi police station of solapur district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | विवाहितेचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी ! 2 वर्षापुर्वीच्या मर्डरचा पर्दाफाश, जाणून घ्या पुण्याच्या मुळशी तालुक्यातील प्रकरण

Aurangabad Crime | खळबळजनक ! प्राध्यपकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापल्या, विचित्र खूनाच्या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला

Anil Deshmukh | CBI चं पथक अनिल देशमुखांच्या घरी दाखल, मुलगा सलील देशमुखला अटक होण्याची शक्यता