Solapur Crime | एसटी चालकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | काेंडी (ता. सोलापूर) येथे एसटी चालकाच्या (ST Driver) मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. बुधवारी दुपारी अडीच वाजता हा प्रकार (Solapur Crime) घडला. अमर तुकाराम माळी (Amar Tukaram Mali) (वय, 20) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून याबाबतची नोंद सिव्हील पोलीस चौकीत (Civil Police Chowki Solapur) झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमर माळी (Amar Mali) याचे दयानंद महाविद्यालयात 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. काही दिवसांपासून तो शांत शांत रहात होता. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी (Tukaram Mali) यांच्याकडे काही पैशांची मागणी केली होती. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून एसटीचा संप (ST Workers Strike) सुरु असून पगार नाही. पैसे कुठून देणार असे वडीलांनी अमरला सांगितले. त्यानंतर ते तेथून आंदोलनस्थळी निघून गेले. तर अमरही बाहेर गेला. त्यानंतर दुपारच्या सुमारास अमर घरी परत आला असता त्याची आई आणि व त्याची चुलती जेवण करत होते. त्याला जेवणासाठी बोलावले मात्र, त्याने नकार देत रुममध्ये जाऊन विश्रांती घेतो असे सांगितले. (Solapur Crime)

थोड्यावेळानंतर आईने पुन्हा त्याला जेवणासाठी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न दिल्याने त्यांनी रुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
पण आतून कडी असल्याने तो उघडला गेला नाही. मोठ्या भावानेही आवाज दिला.पण तरीही आतून काही आवाज येत नसल्याने खिडकीतून पाहिले असता अमरने साडीच्या साहाय्याने गळफास (Suicide) घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

दरवाजा तोडून भावाने रुममध्ये आत प्रवेश केला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू (Died) झाला.
दरम्यान, आंदोलनामध्ये सहभागी झालेले तुकाराम माळी यांना घरी बोलावण्यात आले.
ही घटना समजताच वडीलांच्या डोळ्यातील अश्रुचा बांध फुटला.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती.

Web Title : Solapur Crime | st-strike the father went to the st movement and thechild strangled his mother with his sari

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे