Solapur Crime | माढा तालुक्यात टेंभुर्णी पुलाशेजारी ट्रक-टॅंकरचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू तर 6 जखमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Solapur Crime | तांदळाचा ट्रक आणि मळीचा टॅंकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात (Accident) ५ ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री माढा तालुक्यातील भीमानगर (टेंभुर्णी) पुलाशेजारी घडला. (Solapur Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मळीचा टॅंकर (एमएच १४ सीपी ४०२०) इंदापूरहून सोलापूरच्या (Indapur-Solapur Road) दिशेने निघाला होता. तर तांदळाचा ट्रक ( एमएच २५ यु ४०४५) सोलापूरकडून येत होता. दोन्ही वाहने भीमानगर येथील एका पुलाजवळ सरदारजी ढाब्यासमोर आल्यानंतर तांदळाचा ट्रक डिव्हायडरला धडकून मळीच्या टॅंकरवर जोरात आदळला. अपघात इतका भीषण होता की, ट्रक पलटी झाला. (Solapur Crime) यामध्ये मळीच्या टॅंकरच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकच्या केबीनमध्ये बसलेले ५ जण जागीच ठार झाले. त्याचबरोबर ट्रकमध्ये असणारी लहान मुलं आणि स्त्रीया असे एकूण ३ जण जखीम झाले असून त्यांच्यावर इंदापूर जवळील रुग्णालयात दाखल केले आहे.

 

Web Title : Solapur Crime | Terrible accident of truck-tanker near Tembhurni bridge in Madha taluka; 5 killed on the spot and 6 injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, तीन ट्रक एकमेकांना धडकले

Mutual funds | अवघ्या 10,000 रुपयांची मंथली SIP बनवू शकते तुम्हाला करोडपती, जाणून घ्या सविस्तर

Shashikant Shinde | शिवेंद्रसिंहराजेंची राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंवर खरमरीत टीका, म्हणाले…

Shashikant Shinde | शिवेंद्रसिंहराजेंची राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंवर खरमरीत टीका, म्हणाले…

SGB Scheme | सरकारच्या ‘या’ योजनेतून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, येथे जाणून घ्या कधी होईल सुरुवात