Solapur Crime | पुण्यातील भाडयाच्या घरात सुरू होती बनावट नोटांची छापाई; सोलापूर पोलिसांनी छापा टाकत जप्त केल्या नोटा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी शहरामध्ये बनावट नोटा (Fake Note) चालविणाऱ्या दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या (Solapur Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch Solapur) पथकाने अटक करून बनावट नोटा जप्त केल्या. त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. दरम्यान, या नोटा पुण्यातील एका भाड्याच्या खोलीत तयार केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना (Solapur Crime) मिळाली. पोलिसांनी पुण्यात छापा टाकून 500 रुपयांच्या 100 बनावट नोटांचा बंडल जप्त केला. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक (LCB Solapur Arrest Fourt Criminals) करून 500 रुपयांच्या 1173 (5 लाख 86 हजार 500) नोटा जप्त केल्या आहेत.

हर्षल शिवाजी लोकरे (वय 20, रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर), सुभाष दिगंबर काळे (वय 36, रा. भोयरे, ता. माढा), गणेश शिंदे (रा. कुर्डूवाडी), पप्पू भारत पवार (रा. कंदर, ता. करमाळा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Solapur Crime)

कुर्डूवाडी-टेंभूर्णी रोडवरील (Kurduwadi-Tembhurni Road) बालोद्यान चौकामध्ये बनावट नोटांची बॅग घेऊन आलेल्या हर्षल याला शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Solapur)अटक केली. त्याच दिवशी पोलिसांनी सुभाष काळे यालाही अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत कुर्डूवाडी येथील किराणा दुकानदार गणेश शिंदे याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिंदे याला अटक केली. आरोपींकडे केलेल्या चौकशीत या बनावट नोटांची छापाई पुण्यातील एका भाड्याच्या खोलीत केली जात असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी पुण्यात छापा टाकला असता, नोटांची छापाई करणारी मशीन (प्रिंटर, कॉम्प्युटर व इतर साहित्य) जप्त
केले. त्यावेळी पोलिसांना 500 च्या 100 बनावट नोटांचा बंडल आढळून आला.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना पप्पू पवार याला अटक केली. त्याच्याकडून 580 नोटा जप्त केल्या.
आतापर्यंत पोलिसांनी 1173 बनावट नोटा जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.

सहा महिन्यांपासून सुरू होती बनावट नोटांची छपाई

अटक करण्यात आलेले आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
सुभाष काळे आणि पप्पू पवार हे दोघे एजंट म्हणून काम करत होते.
पुण्यात बनावट नोटांची छापाई झाल्यानंतर ते दोघे बनावट नोटा बाजारात खपविण्याचे काम करत होते.
त्याबदल्यात त्यांना कमिशन मिळत होते. नोटांची छापाई करण्यासाठी लागणारा कागद पुण्यातून विकत घेत होते,
असे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपींनी आत्तापर्यंत किती नोटांची छापाई केली आहे आणि कुठे कुठे
त्या खपवल्या आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Solapur Crime | the fourth suspect in the case of fake currency notes printing of 1173 notes in a rented house in pune solapur crime lcb

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | ‘जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेऊन काम करणार असतील…’; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Devendra Fadnavis-Balasaheb Thorat | बाळासाहेब थोरातांसमोरच देवेंद्र फडणवीसांची भर स्टेजवर काँग्रेसच्या मोठया नेत्याला ओपन ऑफर

Jayant Patil On Maharashtra Govt | ‘महाराष्ट्र सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमीच’ – जयंत पाटील