Solapur Crime | मंदिरात लग्न पत्रिका ठेवून परतताना काळाचा घाला, पुण्यातील नवरदेवासह तिघांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Solapur Crime | अक्कलकोट येथील मंदिरात (Akkalkot Temple) आपल्या लग्नाची (Wedding Card) पत्रिका ठेवण्यासाठी गेलेल्या नवरदेवासह (Groom) तिघांचा ट्रक व कार अपघातात (Accident) जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेले तिनही तरुण पुण्यातील (Pune) हिंजवडी (Hinjawadi) परिसरातील रहिवासी होते. बुधवारी (दि.8) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर (Akkalkot-Gangapur Road) बिंजगेर येथे हा (Solapur Crime) अपघात झाला. हिंजवडी परिसरातील तीन उमद्या तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

दिपक सुभाष बुचडे Deepak Subhash Buchade (वय-29 रा. मारुंजी), आकाश ज्ञानेश्वर साखरे Akash Dnyaneshwar Sakhare (वय-28 रा. हिंजवडी), आशुतोष संतोष माने Ashutosh Santosh Mane (वय-23 रा. हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक याचे चुलत भाऊ चंद्रकांत राघुजी बुचडे Chandrakant Raghuji Buchade (वय-41 रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी अक्कलकोट (दक्षिण) पोलीस ठाण्यात (Akkalkot (South) Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात ट्रक (ट्रेलर) चालकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.(Solapur Crime)

 

मृत दीपक बुचडे याचे 18 जून रोजी लग्न होते. त्यासाठी लग्न पत्रिका छापण्यात आल्या होत्या. लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. नातेवाईक, मित्र यांना लग्न पत्रिका देण्यापूर्वी देवाच्या दारात पत्रिका ठेवण्यासाठी तिघेजण बुधवारी सकाळी तुळजापूर (Tuljapur), अक्कलकोट, गाणगापूरला (Ganagapur) निघाले होते. दरम्यान दीपक याने बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घरी फोन करुन तुळजापूर येथे पत्रिका ठेवल्यानंतर आम्ही आता गाणगापूरच्या दिशेने जात असल्याचे सांगितले. त्यानंतर साडे अकराच्या सुमारास अक्कलकोट पोलिसांनी फोन करुन दीपकच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती दिली.

दीपकच्या गाडीचा अपघात झाल्याचे समजताच हिंजवडीसह मारुंजी परिसरातील तरुणांनी अक्कलकोटच्या दिशेने धाव घेतली.
फिर्यादी चंद्रकांत यांनी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता तिघांचाही मृत्यू झाल्याचे समजले.
या घटनेची माहिती हिंडवडीसह मारुंजी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
परिसरातील तीन तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

परिसरात ‘अक्की’च्या रिल्सची क्रेझ
अपघातात मृत्यू झालेल्या आकाश साखरे हा परिसरात ‘अक्की’ नावाने ओळखला जात होता.
तसेच रिल्स (Reels) बनवण्याची आवड असल्याने तो कायम चर्चेत असायचा.
अक्कीच्या रिल्सला चांगला प्रतिसाद मिळत होता. वेगवेगळ्या गाण्यावर तो रिल्स बनवत होता.
त्याची परिसरातील तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ होती. त्याचा देखील काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.

 

Web Title :- Solapur Crime | three people of pimpri chinchwad pune died in akkalkot gangapur road accident near solapur crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Snehalaya Balbhavan HSC Result | यंदाही स्नेहालय मधील बालकांचा बारावीचा निकाल 100 टक्के

 

Kisan Vikas Patra | 1000 रुपयांपासून करू शकता बचतीला सुरुवात, इतक्या दिवसात डबल होतील पैसे

 

Eknath Khadse On BJP | ‘भाजपने माझ्यावर अन्याय केला परंतु शरद पवारांनी विश्वास दाखवत संधी दिली’ – एकनाथ खडसे