Solapur Crime | मंगळवेढा येथील बहुचर्चीत दोन दरोड्याचा उलघडा, दरोडेखोरांची टोळी गजाआड; पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथून अटक

सोलापूर / मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime) मंगळवेढा तालुक्यातील (Mangalvedha Taluka) बहुचर्चित दोन दरोड्याचा (Robbery) उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये दरोडेखोरांची आंतरराज्यीय टोळीला (Interstate Gang) अटक करण्यात आली असून या अट्टल दरोडेखोरांकडून 5 लाखाचे 10 तोळे सोने (Gold) जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुणे जिल्ह्यातील (Pune District) लोणावळा (Lonavla) येथून अटक (Arrest) करण्यात आली आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील (SDPO Rajashree Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या (Mangalwedha Police Station) हदिद्दत दोन दरोडे झाले होते. यातील पहिल्या घटनेमध्ये दामाजीनगर मधील सुवर्णा हजारे यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडुन दरोडेखोरांनी प्रवेश करून त्यांना व त्यांच्या पतीला लोखंडी गजाने मारहाण (Beating) करून, हात फॅक्चर करून 1.5 तोळे वजनाचे सोने लुटून नेले होते. तसेच दुसऱ्या घटनेमधील चैतन्यनगर नागणेवाडी येथील मंदाकीनी सावजी यांच्या बंगल्याच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश करून नव वधु दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडुन 11 तोळे 3 ग्रॅम सोने लुटून नेले होते. (Solapur Crime)

 

मंगळवेढा शहरातील या पडलेल्या सलग दोन दरोडयामुळे मंगळवेढा शहरात भितीचे व असुरक्षतेची वातावरण निर्माण झालेले होते. दोन्ही दरोडे उघडकीस आणणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते. पोलीसांनी सदर प्रकरणात सखोल तपास करून तांत्रिक (Technical) पुराव्याचा आधार घेवुन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी गोपनीय बातमीदारा मार्फत व तांत्रिक पुराव्याच्या आधारे 31 जानेवारी 2022 रोजी लोणावळा येथुन आरोपींना अटक केली. आरपींकडून 5 लाख रूपये किमतीचे 10 तोळे सोने जप्त केले. यातील आरोपींनी यापूर्वी महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), कर्नाटक (Karnataka) येथे अशाप्रकारे गुन्हे केल्याचे माहिती मिळाली असून यातील आणखीन दोन आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते (SP Tejasvi Satpute), अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव (Addl SP Himmatrao Jadhav),
उप विभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा विभाग राजश्री पाटील (Sub Divisional Police Officer Rajashree Patil),
स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीणचे (Local Crime Branch Solapur Rural)
पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील (Police Inspector Sarjerao Patil)
मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने (Mangalvedha Police Station Police Inspector Ranjit Mane)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बापु पिंगळे (API Bapu Pingale), पोलीस उप निरीक्षक अविनाश पाटील (PSI Avinash Patil),
पोलीस नाईक दयानंद हेंबाडे, विठ्ठल विभुते, सचिन बनकर, पोलीस कॉन्स्टेबल सुरन देशमुख, सोमनाथ माने,
तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मंगळवेढा कडील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, पोलीस नाईक सुनिल मोरे,
तसेच सायबर पोलीस ठाणे (Cyber Police Station) सोलापुर ग्रामीण कडील पोलीस कॉन्स्टेबल अन्तर आत्तार व तसेच स्थानिक गुन्हे पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलीस कॉन्स्टेबल नारायण गोलेकर यांनी कारवाई केली आहे.

 

Web Title :- Solapur Crime | Two notorious robberies arrested Mangalvedha Solapur, gang of robbers go missing; Arrested from Lonavla of Pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ind Vs SL New Schedule | लखनऊमध्ये होणार भारत-श्रीलंकेचा पहिला टी-20 सामना, BCCI ने जारी केले नवीन वेळापत्रक

 

Pune Crime | मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बंडगार्डन पोलिसांकडून पर्दाफाश, 15 लाखांचे 70 मोबाईल जप्त (व्हिडिओ)

 

Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुकीवर दुप्पट होतील पैसे, बुडण्याची सुद्धा भीती नाही; जाणून घ्या सविस्तर