Solapur Crime | पत्नीच्या जाचाला कंटाळून तरुण व्यावसायिकानं संपवलं जीवन; आत्महत्या करण्यापूर्वी केला WhatsApp मेसेज

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | एका मंडप डेकोरेटर व्यावसायिकाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना (Solapur Crime) घडली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात (Barshi News) घडली. संतोष गायकवाड (Santosh Gaikwad) असं आत्महत्या केलेल्या तरुण व्यावसायिकाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, संतोषचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे. त्यांनी स्वत:च्याच दुकानात आत्महत्या केली आहे. पंख्याला कापडाची पट्टी बांधून गळफास घेत त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. आत्महत्या करण्याआधी त्यांनी त्याच्या काही मित्रांना व्हॉट्सॲपवर मेसेज केला होता. या मेसेजमध्ये त्यांनी आपण आत्महत्या का करतोय याचं कारण स्पष्ट केलं आहे. या मेसेजमध्ये त्यांनी त्यांची बायको, सासरे आणि मेव्हणीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आहे. (Solapur Crime)

 

मृत संतोष गायकवाड यांची सुसाईट नोट –

शेवटचा नमस्कार आपणास माझा..मी माझ्या बायकोच्या टेंशनमुळे हा निर्णय घेतोय..गेली 8 महिन्यापासुन मी स्वत: खुपच टेंशन मध्ये जगत होतो, पण आता माझी सहन करायची क्षमता संपली आहे. आजपर्यंत आपण मला खुप सहकार्य केले आहे. तरी हिच भावना माझ्या मुलांन बद्दल राहु द्दा हिच आपल्या कडुन मला खरी श्रध्दांजली असेल, माझ्या ह्या आत्महत्याच्या निर्णयात कुणाचाही सहभाग किंवा अडचण नाही, हा निर्णय मी फक्त आणी फक्त माझ्या बायकोमुळे घेत आहे.. माझी बायकोला होत असलेली अडचन मी स्वत: दुर करीत आहे. जगाला दाखवण्यासाठी 4 दिवस रडुन तु (अनुराधा गायकवाड) एकदम निवांत हो..पायल व विराज बाळा तुम्ही आईसोबत एकञ रहा..पायल मी तुझा खरच अपराधी आहे बाळा. पिल्लु.. पुन्हा एकदा आपल्या सर्वाना शेवटचा जय शिवराय.

 

माझ्या आत्महत्याचा निर्णयात कुणाचाही सहभाग नसुन हा माझा निर्णय आहे.
यासाठी कुणीही कोनत्याही व्यक्तीला जबाबदार धरू नये…शेवटी माझ्या बायकोची, मेव्हणीची, सासुची ईच्छा पुर्ण व्हावी म्हणुन हा मी निर्णय घेत आहे.
मला गेली 8 महिन्यापासुन माझ्या सासुने, मेव्हणी (रेणुका साखरे), व बायकोने खुपच त्रास दिलाय.
व त्यांची इच्छा पुर्ण व्हावी म्हणुन मी आत्महत्या करीत आहे. आपलाच…(संतोष गायकवाड)

 

Web Title :- Solapur Crime | young businessman from solapur commits suicide ends his life after being harassed by his wife before suicide send whatsapp massage

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा