Coronavirus : सोलापूरमध्ये ‘कोरोना’ व्हायरसचा ‘शिरकाव’, एकाचा रूग्णाचा मृत्यू, प्रशासकीय यंत्रणा ‘सतर्क’ (व्हिडीओ)

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशातील आणि राज्यातील परिस्थिती देखील गंभीर बनली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुक्त जिल्ह्यात गणल्या जाणार्‍या सोलापूर जिल्हयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत्यूनंतर त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी आला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणावरून सोलापूरमध्ये देखील कोरोनानं शिरकाव केल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

10 एप्रिल रोजी रूग्णास हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 11 एप्रिल रोजी पहाटे रूग्णाचा मृत्यू झाला असून त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सोलापुरातील पाच्छा पेठेतील व्यक्तीचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं परिसर सील करण्यात आला असल्याचं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं आहे.