सोलापूर महोत्सवाचे पुण्यामध्ये उदघाटन…

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन-सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या वतीने म्हात्रे पुलाजवळील पंडीत फार्मस येथे भरविण्यात आलेल्या सोलापूर महोत्सवाचे उदघाटन हभप गुरुबाबा अवसेकर महाराज यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख, राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी व अन्य मान्यवर उपस्थित होते. सोलापूरची विविध उत्पादने, कलादालन, पर्यटन व्यवसाय, खाद्यसंस्कृती आणि चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या वतीने 16 ते 18 नोव्हेंबर असे तीन दिवस महोत्सव भरविण्यात आलेला आहे. पुणेकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमंगल मल्टीस्टेट को अॉफ सोसायटीचे शाखा सल्लागार सतीश साठे यांनी केले आहे.