Solapur Fire News | वाऱ्याने केला घात! चुलीतून उडालेल्या ठिणगीमुळे झोपडी पेटून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Solapur Fire News | सोलापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये पाणी तापवण्यासाठी भल्या पहाटे पेटवलेली चूल वृद्ध दाम्पत्यासाठी कर्दनकाळ ठरली आहे. चुलीतून उडालेल्या ठिणगीमुळे या वृद्ध दाम्पत्याच्या झोपडीला आग लागली आणि काही क्षणात ती संपूर्ण झोपडी जळून खाक झाली. या दुर्घटनेत वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यातील गाडेगाव शिवारामध्ये हि घटना घडली आहे. या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. आज पहाटेच्या सुमारास हि घटना घडली आहे. (Solapur Fire News)

भीमराव काशीराम पवार (वय 95) आणि कमल भीमराव पवार (वय 90) अशी मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरख भोसले, सर्जेराव गायकवाड, राजेंद्र मंगरूळ, आप्पासाहेब लोहार, महेश डोंगरे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. (Solapur Fire News)

काय घडले नेमके ?
कमल भीमराव पवार यांनी पहाटे उठून पाणी तापवण्यासाठी चूल पेटवली होती. त्याचवेळी म्हैस सुटल्यामुळे त्यांनी नातू प्रथमेशला उठवले. यादरम्यान म्हैस बांधत असताना झोपडीला आग लागली. आजी आणि नातवाने आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले आणि त्यामध्ये हि झोपडी जळून खाक झाली. कमलबाई यांचे पती भीमराव पवार झोपडीत झोपलेले असल्यामुळे त्यांना उठवण्यासाठी कमलाबाई झोपडीमध्ये गेल्या मात्र आग वाढल्याने दोघेही आत अडकले त्यांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

Web Title :- Solapur Fire News | elderly couple dies after hut catches fire from hearth spark in solapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Double Murder Case | पुण्यातील दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकललं, आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी UPSC करणाऱ्याने दाम्पत्याला संपवलं

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला केवळ खुर्च्यांची गर्दी’, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Ajit Pawar | आपल्याला बदला घ्यायचा आहे, पोटनिवडणूकीच्या जाहीर सभेत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी