Solapur Fire News | विवाहस्थळी वऱ्हाडाच्या बसने अचानक घेतला पेट; सोलापूरमधील घटना

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Solapur Fire News | सोलापूर जिल्ह्यामधील माढा तालुक्यातील मोडनिंब या गावी पुण्याहून विवाहासाठी आलेल्या वऱ्हाडाच्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याची घटना 23 फेब्रुवारी गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. बसने अचानक पेट घेतल्याने विवाह मंडपात अग्नीचे स्तोम माजले होते. सुदैवाने या आगीत नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही पण बस मात्र जळून खाक झाली आहे. (Solapur Fire News)

काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील नारायण पेठे येथील रोहित राजेंद्र मसूरकर या तरुणाचा विवाह सोलापूर जिल्हयातील मोडनिंब येथील अश्विनी सौदागर शिंदे या तरुणीसोबत आज दुपारी नियोजित होता. मुलीच्या गावी म्हणजे मोडनिंब इथे हा विवाहसोहळा पार पडणार असल्याने नवरदेवासह त्याचे नातेवाईक खाजगी बसने पुण्याहून गुरुवारी रात्रीच म्हणजेच लग्नाच्या आधल्या दिवशीच नवरीच्या घरी दाखल झाले होते. या बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. (Solapur Fire News)

वऱ्हाडी मंडळींची ही खासगी बस माढ्यातील शिवपार्वती मंगल कार्यालयाबाहेर पोहोचली.
वऱ्हाडी मंडळी बसमधून उतरले मात्र बस चालक उतरायचा बाकी होता, इतक्यातच बसने अचानक पेट घेतला.
आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत चालकाला तातडीने बसबाहेर काढलं आणि आग विझवण्याचा
प्रयत्न करु लागले. परंतु आग विझवेपर्यंत बस जळून खाक झाली.
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष म्हणजे आग लागल्याचं लक्ष्यात येताच नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून आजूबाजूला असलेली जवळपास
30 इतर वाहनंही बाजूला केली त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली. या घटनेने, वऱ्हाडी मंडळींची पुरती
तारांबळ उडाली पण तरीदेखील नियोजित वेळेवर हा लग्न सोहळा पार पडला.

Web Title :- Solapur Fire News | the groom reached the wedding venue for the wedding and suddenly the bus caught fire

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paresh Rawal | ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाचा टीझर शूट संपन्न; चित्रपटात पाहायला मिळणार अनेक ट्विस्ट

Ahmadnagar Crime News | रात्री आडोशाला बसून दारू पिणे पडले महागात; काय आहे नेमके प्रकरण?