Lockdown 3.0 : ‘लॉकडाऊन’मुळं केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलं लग्नकार्य

सोलापूर :पोलीसनामा ऑनलाइन –लॉकडाऊन मुळे लांबत चाललेले लग्न आज अखेर पार पडले, प्रदिप गायकवाड आणि पौर्णिमा बनसोडे यांचा लग्न सोहळा बक्षीहिप्परगे गावात आज साध्या पद्धतीने पार पडला, केवळ लॉक डाऊन मुळे थांबलेला विवाह पोलीस खात्याची आणि शासनाची परवानगी घेऊन वधू आणि वर यांच्या आईवडिलांच्या उपस्थितीत आज पार पाडण्यात आला.

यासंबंधी चे वृत्त असे की, मौजे बक्षीहिप्परगे येथील मुलगी पौर्णिमा बनसोडे हिचा विवाह डोंबरजवळगे गावातील मुलगा प्रदीप गायकवाड ह्याच्या सोबत ठरले होते, लग्नाची तारीख एप्रिलमध्ये होती परंतु लॉक डाऊन मुळे लग्न वारंवार पुढे सरकू लागल्यामुळे मुलाचे आई वडील पमाबाई विश्वनाथ गायकवाड आणि मुलीचे आई वडील वजाबाई लक्षमन बनसोडे यांनी अंतर्गतनिर्णय घेतला की, पोलिस खात्याची व शासनाची परवानगी घेऊन घरीच लग्नकार्य उरकून टाकू. त्या प्रमाणे त्यांनी पोलीस खात्याची आणि शासनाची व ग्रामपंचायत यांची तसेच सरपंच पोलीस पाटील यांची परवानगी घेऊन आज दिनांक 7 मे 20 रोजी बुद्ध पौर्णिमा च्या मुहूर्तावर हे लग्न कार्य मुली चे आई वडील आणि मुलाचे आई वडील तसेच RPI (आठवले D N गायकवाड, अविनाश गायकवाड,RPI(आठवले)सचिव संदिप गायकवाड,परिवर्तन मंडळ बक्षीहिप्परगे
पोलीस पाटील पुनमताई गायकवाड, बाबासाहेब गायकवाड,पप्पू गायकवाड यांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमाप्रमाणे पार पाडण्यात आला.

या लग्नकार्याला कोणीही नागरिक किंवा पाहुणे उपस्थित नव्हते.मुलगी बक्षीहिप्परगे गावातील च असल्यामुळे परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष गायकवाड यांनी पुढाकार घेऊन लॉक डाऊन मुळे लांबत चाललेले हे लग्न आज लावले.