home page top 1

पहिली तीन लग्न झाली असताना चक्‍क चौथे लग्न ! ‘तो’ लखोबा लोखंडे ‘गोत्यात’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पहिली तीन लग्न झाली असताना चौथे लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या लखोबा लोखंडेच्या मनसुब्यावर पाणी फिरले. पहिल्या तीन बायकांना त्रास दिल्यामुळे त्या सोडून गेल्या होत्या. तो पुन्हा चौथे लग्न करत असल्याची माहिती पहिल्या तीन बायकांना मिळाली आणि त्यांनी त्याचे चौथे लग्न उधळून लावले. प्रकाश जगनगवळी असे व्यक्तीचे नाव आहे असून पहिल्या तीन बायकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर तो फरार झाला आहे.

‘तीन बायका आणि फजिती ऐका’ या म्हणीप्रमाणे आणि एखाद्या सिनेमात किंवा नाटकात घडावे असे सोलापूरात घडले. प्रकाशचे २००६ मध्ये पहिले लग्न झाले होते. त्याने पहिल्या पत्नीला रिक्षा घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत यासाठी तिचा छळ केला. त्याच्या छळाला कंटाळून ति माहेरी निघून गेले. त्यानंतर प्रकाशने २०१५ मध्ये एका मुलीला आपण बीएसएनएलमध्ये काम करत असल्याचे सांगून तिच्याशी लग्न केले. तिला देखील त्रास दिल्याने तिने प्रकाशला सोडून दिले. दुसरी पत्नी सोडून गेल्याने त्याने तिसरे लग्न केले. मात्र, त्याच्या स्वभावामुळे तिसरी पत्नी देखील त्याला सोडून गेली.

प्रकाशने चौथे लग्न करण्याचा घाट घातला होता. मात्र, याची माहिती पहिल्या तिन बायकांना मिळाली आणि चौथे लग्न करण्याच्या तयारीत असताना तिन्ही बायकांनी एकत्र येऊन त्याचे बिंग फोडले. पहिल्यात तीन बायकांनी एकत्र येऊन चौथ्या तरुणीचे आयुष्य वाचवले. प्रकाश फरार झाला असून तो इतरांची फसवणूक करण्याची शक्याता असल्याने त्याच्यापासून सावध रहा असा सल्ला देण्यात आला आहे.

Loading...
You might also like