सोलापूर : बाजार समिती निवडणुकीत सहकारमंत्री विरूध्द पालकमंत्री

सागर सुरवसे

सोलापूर :पोलीसनामा आॅनलाईन

देशात पहिल्यांदाच सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीतील आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. सहकार कायद्यातील बदलानंतर आता पहिल्यांदाच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १ जुलै रोजी होत आहे. यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख विरुध्द कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांच्यासोबतच खुद्द सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजप आमदार विजयकुमार देशमुख निवडणुकीत शड्डू ठोकून उभे आहेत… त्यामुळे सहकारमंत्री एकाकी पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतू असे असले तरी भाजप विरोधात सर्वांना एकत्र व्हावे लागले यातच माझे यश असल्याची प्रतिक्रिया सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

[amazon_link asins=’B01N4BBOES’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6f90d9dc-7c4d-11e8-8aca-5b3d97fd5598′]

बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस विरोधात भाजप अशी लढत होण्याची अपेक्षा फोल ठरत खुद्द भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे काँग्रेस गोटातील सिद्धेश्वर पॅनलमधून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप अशा सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेल्या सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलची लढत सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाच्या श्री सिद्धरामेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनलशी होणार आहे. त्यामुळे भाजप विरुध्द कॉंग्रेस ऐवजी भाजप विरूध्द भाजप असेच चित्र पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सहकारमंत्री गटाच्या श्री. सिध्दरामेश्वर परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार शिरीष गंगाधर पाटील यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बाजार समितीच्या मालकीची जागा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी लाटली असून त्याचा मोबदला परत न देण्यासाठीच त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे अशा स्वार्थी नेत्यांपासून सावध राहण्याचे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’40412fac-7c4d-11e8-9fb2-db0bb4c6f86a’]

दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्य निवडीसाठी रविवार दि. १ जुलै रोजी मतदान होणार असून ३ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेतकरी राजा सहकारमंत्र्यांना सहकार्य करणार की पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे पालकत्व स्विकारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.’

शिरीष पाटील यांनी पालकमंत्र्यांवर केलेले आरोप 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात असलेली शहरातील सर्वे नंबर टीपी २ फायनल प्लॉट नंबर ९७ च्या जागे पोटी जागा सोडवून घेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या मार्केट कमिटीच्या सभापती आणि संचालक मंडळींशी संगनमत करून संदिग्ध व्यवहार आणि ठरावाच्या माध्यमातून बाजार समितीची फसवणूक करून आपल्या ताब्यात परत घेतले आहे. वास्तविक पाहता बाजार समितीने माननीय विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर केलेल्या तडजोडीच्या प्रस्तावानुसार बाजार समितीच्या ताब्यात असलेल्या जागा परत घेताना बाजार समितीला मोबदला म्हणून परत घेतलेल्या जागेच्या दुप्पट जागा बाजार समितीस देण्याचे ठरले होते. परंतु बाजार समितीच्या ताब्यात असलेली जागा नियमबाह्य विनामोबदला खरेदी घेऊन त्यापोटी ठरावाप्रमाणे बाजार समितीला द्यावयाची दुप्पट जागा दिली नाही.यासर्व प्रक्रियेला सहकार खात्याचे उपनिबंधकांची तसेच माननीय जिल्हाधिकारी व माननीय पणन संचालकांची परवानगी घेणे बंधनकारक असतानाही, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अशा पद्धतीने बेकायदेशीर रित्या संगनमताने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5dca1275-7c4d-11e8-b5fc-33d7018ea0c6′]

यासर्व प्रक्रियेमध्ये तत्कालीन सभापती व संचालक मंडळ जे आताच्या निवडणुकीत उमेदवार देखील आहेत. त्यांच्याशी असलेले जुने हित संबंध जोपासण्यासाठी मा. पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे कॉंग्रेसच्या कळपात जाऊन निवडणूक लढवीत आहेत. अशा संधिसाधू नेतेमंडळीचे पितळ उघड करण्यासाठी मी शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ही निवडणूक लढवीत आहे.

यासर्व भ्रष्ट प्रकारची स्वतंत्र चौकशी होऊन याप्रकरणातील दोषी असेलेल्यांवर कायदेशीर कारवाही करण्याची मागणी मी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा. पणन मंत्री श्री. सुभाष देशमुख यांच्याकडे करणार आहे.तरी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांनी श्री. सिद्धारामेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून भ्रष्ट व संधीसाधू नेत्यांना धडा शिकवावा ही विनंती…         
                                                                                                                               – शिरीष गंगाधर पाटील,
                                                                                                   श्री. सिद्धारामेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलचा
                                                                                                                   कुंभारी गणातील अधिकृत उमेदवार