‘महाविकास’चं ‘इथं’ बिघडलं, महापौरपदी भाजप उमेदवाराची निवड

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर महानगरपालिकेत पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणूकीत भाजपने बाजी मारली आहे. महाविकासआघाडीचा प्रयोग या महापालिकेत फसला. भाजपच्या श्रीकांचना यन्नम महापालिकेच्या महापौर झाल्या. त्यांना एकूण 51 मतं मिळाली. नव्या महापौर श्रीकांचना यन्नम विणकर समाजाच्या 8 व्या आणि पहिल्या महिला महापौर ठरल्या. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी महाविकासआघाडीचा महापौर बसेल असा दावा केला होता तो फेल गेला. तेथे भाजपने बाजी मारली.

सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. आता महापौर पदी देखील भाजपचा उमदेवार निवडून आला. श्रीकांचना यांनी आपल्या प्रतिस्पर्धी शाहजादीबानो शेख यांचा 51 विरुद्ध 8 मतांनी पराभव केला. महाविकासआघाडी करुन सोलापूर महापालिकेत महाविकासआघाडीचा महापौर बसवण्याचा प्रयत्न मात्र फसला.

महापौर निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा या पक्षांचे नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे भाजपला आपला महापौर निवडूण आणणे आधिक सोपे झाले. विशेष काय तर या निवडणूकीत शिवसेनेचे राजकुमार हंचाटे आणि बसपाचे स्वाती आवळे यांनी भाजपच्या महापौरांना मतदान केली.

Visit : policenama.com