मेव्हणीशी असलेल्या अनैतिक संबंधातून 3 मुलांना विष पाजून स्वतःला संपवलं, ‘तो’ पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा

सोलापूर (बेंबळे) : पोलीसनामा ऑनलाइन – जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या तीन मुलांना विषारी औषध पाजल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर अवस्थेत आहे. या प्रकारानंतर स्वत: पित्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे येथे मेव्हणी राहात असलेल्या गावातच हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

रवींद्र प्रभाकर लोखंडे (रा. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे हे टोकाचे पाऊल उचललेल्या तरूणाचे नाव आहे. त्याने विष पाजलेल्या अजिंक्य (वय ९) व आयुष (वय ६) या दोन मुलांचा मृत्यू झाला. तर थोरली मुलगी अनुष्का (वय ११) हिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून तिचे प्राण वाचविण्याचे शर्थीने प्रयत्न होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रविंद्र लोखंडे हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावचा रहिवाशी आहे. तो वडापुरी येथे आपल्या कुटुंबासह राहात होता. माढा तालुक्यातील बेंबळी गावात तो आपला मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का यांच्यासह सुनिता कांबळे या मेव्हणीला भेटायला गेला होता. काही कारणाने त्यांच्यात वाद झाले. त्यावर रविंद्रने स्वत: आपल्या मुलांना शीतपेयातून विषारी औषध पाडले व स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

रविंद्रने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. तसेच त्याने मोबाईलवरून आपल्या मित्रांना व नातेवाईकांना मेसेज पाठवला आहे. यामध्ये त्याने माझे व मेव्हणी सुनिता हरी कांबळे हिचे प्रेमसंबंध होते. मात्र, तिने माझा विश्वासघात केला. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. तर माझ्या व मुलांच्या मृत्यूस केवळ सुनिता कांबळे हिला जबाबदार धरण्यात यावे असा उल्लेख केला आहे. पुढील तपास टेंभूर्णी पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या