सोलापूर : पोटच्या मुलींच्या चारित्र्यावर संशय, मध्यरात्री पोरींना रस्त्यावर झोपवून अंगावरून घातला ट्रक, नंतर बापानं केली आत्महत्या,

करमाळा / सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्यातील काळीज पिळवटून टाकणारी एक दुर्देवी घटना घडली आहे. येथील करमाळा तालुक्यातील सावडी गावामधील वडिलांसहित  त्यांच्या २ मुलींना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. वडील भरत भराटे ( वय, ४५), नंदिनी भरत भराटे (वय, १९) आणि वैष्णवी भरत भराटे (वय, १४) अशी त्या मुलींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, इंदोरी (ता. मावळ) येथे भरत भराटे यांचा स्वत:चा ट्रक होता. त्यांना पत्नी आणि ३ मुली होत्या. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुलींचे प्रेमप्रकरण सुरू आहेत, असा संशय भरत भराटे यांना होता. मुलींच्या “अशा’ वागण्याने नाव खराब होईल, यापेक्षा जीव दिलेला बरा, असे भरत भराटे हे पत्नी सपना यांना सतत बोलून दाखवत होते. पण ते असे करतील असे कधी वाटले नव्हते. तर भराटे हे इंदोरी (ता. मावळ) येथे कमी लोकवस्तीत राहात होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ते सर्वजण बाहेर झोपले होते. मुलींच्या प्रेम प्रकरणाच्या संशयातून भरत भराटे हे रविवारी मध्यरात्री १ वाजता उठले व आपला स्वतःचा ट्रक (MH-१२ HD १६०४) चालू करून झोपलेल्या नंदिनी आणि वैष्णवी या मुलींच्या अंगावर घातला व मुलींच्या अंगावरून ट्रक जाताच ट्रकमधून खाली उतरून ते स्वतः त्याच ट्रकखाली उडी मारून जीव दिला, अशी फिर्याद पत्नी सपना भराटे यांनीं दिलीय.

याबाबत अधिक माहिती अशी, की इंदोरी (ता. मावळ) येथे मुलींच्या प्रेमप्रकरणांवर आणि चारित्र्यावर संशय घेऊन मध्यरात्री मुलींना रस्त्यावर झोपविले आणि त्यांच्या अंगावर ट्रक घालून बापानेच खून केला. नंतर बापाने स्वत: ट्रकखाली उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. १७ ) मध्यरात्री घडली. तर भरत भराटे हे धार्मिक वृत्तीचे होते. दरवर्षी भराटे वस्तीवर हनुमान जयंतीनिमित्त होणाऱ्या सप्ताहात वर्गणी देण्यापासून सर्व कामात आघाडीवर असायचे. हलाखीच्या परिस्थितीत पुण्यात जाऊन त्यांनी संसार वाढवला होता. त्यांनी हा निर्णय घ्यायला नको होता. या घटनेने गाव अंतर्मुख झाले आहे. असे गावातील नागरिक म्हणत होते.