राष्ट्रवादीला मोठा धक्‍का ! ‘या’ जिल्हाध्यक्ष, माजी आमदाराचा राजीनामा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्षांतर केले असून काही नेते युतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं खिंडार पडलं आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वसनीय व कट्टर समर्थक मानले जातात. साळुंखे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. सांगोला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. गेल्या काही दिवसापासून दीपक साळुंखे हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्राद्वारे त्यांनी राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्षांना दिलेल्या राजीनामा पत्रात आगामी विधानसभेसाठी सांगोला तालुक्यात लक्ष देण्यासाठी वेळ हवा आहे असे राजीनाम्याचे कारण सांगितले आहे.

DEEPAK-SALUKE

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. दिलीप सोपल आणि रश्मी बागल यांच्यानंतर माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –