सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचं काम रखडणार, ९०४ कोटीच्या प्रकल्पासाठी केवळ एक कोटीची तरतूद

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र लवकरच रेल्वेच्या नकाशावर आणले जाईल, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांनी दिला होता. मागील सत्तेचा कालावधी पूर्ण झाला. अंतरिम अर्थसंकल्पात रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याची घोषणा करण्यात आली. मात्र तरतूद नाममात्र ठेवली गेली. यंदाच्या जिल्ह्याच्या पदरात केंद्र सरकारने याबाबत निराशेचा जोगवा टाकला आहे. 904 कोटी रूपयांच्या या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात केवळ एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग पुन्हा निराशेच्या रूळावर अडकला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापुरातील जाहीर सभेत दिलेले सोलापूर-तुळजापूर-जळगाव रेल्वेमार्गाचे आश्वासन सलग दुसर्‍यांना फोल ठरले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र रेल्वे नकाशावर येण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी 5 वर्षांपासून मोठे प्रयत्न केले. रेल्वे लोकआंदोलन समिती, तुळजापूर येथील रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानेही काँग्रेस सरकारकडे पाठपुरावा केला. मोदींकडून तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याची घोषणा झाली. परंतु सोलापूर-तुळजापूर-जळगाव रेल्वेमार्ग पूर्णत्वासाठी आवश्यक असणार्‍या भरीव निधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला निती आयोगाने मंजुरी दिली. यासाठी पूर्वी एक हजार 82 कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव होता. त्यात 288 कोटी रूपयांची कपात करून 994 कोटी रूपयांच्या प्रस्तावित रेल्वेमार्गास मंजुरी देण्यात आली. प्रस्तावित मार्गासाठी मंजूर करण्यात आलेला निधी आणि अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद यात भली मोठी तफावत होती. केवळ एक कोटी रूपये या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले होते. साधारणपणे दरवर्षी 150 ते 200 कोटी रूपये या रेल्वेमार्गासाठी उपलब्ध करून दिले जातील, अशी वल्गनाही करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या गतीने रेल्वेमार्गाचे हे स्वप्न पूर्णत्वास येण्यास शंभर वर्षे देखील पुरणार नाहीत.

उस्मानाबादकरांची पुन्हा थट्टा
सोलापूर-उस्मानाबाद ही तुळजापूर मार्गे नवी रेल्वेलाईन टाकली जाणार आहे. रेल्वे बोर्डाच्या निकषानुसार अंब्रेला वर्क या सदराखाली त्याला मंजुरी देण्यात आली आहे. 84 किलोमीटर असलेल्या या रेल्वेमार्गासाठी 904 कोटी 92 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अंदाजपत्रकात या प्रकल्पासाठी एक कोटी रूपये तरतूद करण्यात आली होती. शुक्रवारी जाहीर झालेल्या केंद्राच्या अर्थसंकल्पात अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या या रेल्वेमार्गाकरिता पुन्हा फक्त एक कोटी रूपयांची अवमानकारक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य उस्मानाबादकर आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदवू लागले आहेत.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री