‘तिरंगा’ अभियानातून देशभक्तीचे संस्कार रुजवणारे दिव्याकांत गांधी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – देशात दिवाळी, दसरा, ईद, नाताळ, बैसाखी सारखे सर्व सण उत्साहात साजरे होत असतात. मात्र स्वातंत्रदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरे करण्यात कोणीही फारसा उत्साह दाखवत नाही. मात्र सोलापूरचे दिव्याकांत गांधी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून समाजाला एकजुटीचा आणि देशभक्तीचा संदेश देत आहेत. मागील चाळीस वर्षापासून ते महाराष्ट्र राज्यासह इतर सर्व राज्यात जाऊन देशभक्तीचा संदेश देत आहेत. स्केटिंग खेळणाऱ्या मुलांच्या समवेत विविध गावांत जाऊन ते स्वातंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त जनजागृती करत आहेत. दिव्याकांत गांधी यांचे बंधू दिलीप गांधी अमेरिकेत स्थायिक आहेत. ते जेव्हाही भारतात येत तेव्हा अमेरिकेपेक्षा भारतीय लोकांच्या मनात देशभक्तीची भावना नसल्याचे सांगितले. भावाने व्यक्त केलली ही खंत त्यांच्या मनात खोलवर रुतली. त्यानंतर त्यांनी तिरंगा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.

स्वतःचा व्यवसाय सांभाळत त्यांनी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला या अभियानाला सुरवात केली. स्वतंत्रता दिन…. दिपावली, दसरा, ईद, बैसाखी ख्रिसमस जैसे मनाओ, राष्ट्रीय त्यौहार जैसै मनाओ म्हणत ते मागील कित्येक वर्षापासून तिरंगा अभियान गावागावात, शहराशहरात, राज्याराज्यात राबवत आहेत. एक्काहत्तर वर्षाचे दिव्याकांत गांधी यांनी नागपूरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. स्वतंत्रदिन आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्व रुजविण्यासाठी शाळकरी मुलांना एकत्र करत विविध अभियान राबविण्यास सुरवात केली. या दिवशी विद्यार्थ्यांना एकत्र करुन प्रभातफेरी काढली जाते. स्केटिंग खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात झेंडा देऊन गाव, वाड्या वस्त्यांवर जाऊन ते स्वतः देशभक्तीची जनजागृती केली जाते. ते सद्भावना सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी शासकीय रुग्णालयात २८ वर्षांपासून धर्मशाळा आणि पाणपोई चालवत आहेत.

बालपणापासूचे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवावी या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क चेतक स्केटिंग चालवत आहेत. विद्यार्थ्यांना स्केटिंगसह पालकांसोबत, समाजात कसे वागावे, शिस्त आणि देशभक्तीचे महत्व पटवून दिले जाते.

आरोग्यविषयक वृत्त